Pune Accident News | पुणे नगर महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Accident News | पुणे नगर महामार्गावरील (Pune Nagar Highway) शिरुर परिसरामध्ये दुचाकी व टेम्पोची जोरदार धडक झाली आहे. या भीषण अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून तीन जखमी झाले आहेत. भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला असून यामध्ये दोन महिला व एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे (Pune Accident News) काही काळ पुणे नगर महामार्गावरील वाहतुक देखील विस्कळित झाली होती.

या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू झाला असून टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिता राजू बोरुडे (वय 40), योगिता सुनील बोरुडे (वय 40), राजू अशोक शिंदे (वय 25, रा. कात्राबाज मांडवगण, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) अशी या अपघातामध्ये दुर्देवी मृत्यु झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. या अपघातामध्ये श्रीराम बापू मांडे (Sriram Bapu Mande,), धीरज कांतीलाल लोखंडे (Dheeraj Kantilal Lokhande) तसेच टेम्पोचालक श्रीराम बापू मांडे (रा. बेलवंडी कोठार, ता. श्रीगोंदा) हे जखमी झाले आहेत. या जखमींवर शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. याप्रकरणी टेम्पोचालक श्रीराम मांडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्रापूर पोलीस ठाण्यात (Shikrapur Police Station) अविनाश निवृत्ती बोरुडे यांनी फिर्याद दिली आहे.

हा अपघात रविवारी सायंकाळी पुणे नगर महामार्गावर शिरुर परिसरामध्ये झाला.
न्हावरा गाव परिसरादरम्यान दुचाकीला भरधाव टेम्पोने धडक दिली.
मालवाहतूक करणाऱ्या या टेम्पोच्या धडकेमध्ये दुचाकीवरील निता बोरूडे (Nita Borude), योगिता बोरूडे
(Yogita Borude), राजू शिंदे (Raju Shinde) गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर तिघांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.
शिक्रापुर पोलिसांना देखील अपघाताची माहिती मिळताच त्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली.
मात्र दुचाकीवरील तिघांचा देखील उपचारापूर्वीच मृत्यू झाला. टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या भीषण अपघातातील (Pune Accident News) अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला
काढल्यानंतर महामार्गावरील वाहतुक सुरळीत झाली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime News | पुण्यातील सिंहगड रोड परिसरात खून; प्रचंड खळबळ