Pune Accident News | भरधाव कारच्या धडकेत रस्त्याच्या दुभाजकाला रंग देणाऱ्या दोघांचा मृत्यू, मुंबई-बेंगलोर हायवेवरील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Accident News | रस्त्याच्या कडेला बॅरिकेट्स लावून पुलावरील दुभाजकाला काळा-पांढरा रंग लावण्याचे काम करणाऱ्या दोन कामगारांना भरधाव वेगातील कारने जोरात धडक दिली. यामध्ये कामगार कारच्या बोनेटवरुन उडून पुलाच्या कठड्यावरून चाळीस फूट खाली कोसळले. यामध्ये गंभीर जखमी होऊन दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि.30) सायंकाळी पाच ते सव्वा पाच वाजण्याच्या दरम्यान मुंबई बेंगलोर हायवे (Mumbai Bangalore Highway) वरील बाह्यवळण रस्त्यावरील डुक्कर खिंडीजळील वारजे भागात झाला आहे. (Pune Accident News )

सनि नंदलाल गौड (वय-23 रा. हारगुडे वस्ती, चिखली, पुणे), विजय बहादुर मटरु चौहान (वय-28 रा. चिखली मुळ रा. उत्तर प्रदेश) अशी मृत्यू झालेल्या दोन कामगारांची नावे आहेत. याप्रकरणी बाळु महादेव शिंदे (वय-39 रा. भैरवनाथ मंदिराजवळ, कुदळवाडी, चिखली) याच्यावर आयपीसी 304 अ, 338, 279 सह मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सीआरपीसी 41(अ)1 प्रमाणे नोटीस दिली आहे. याबाबत अभिजीत रामविलास दास (वय-34 रा. गणपती मंदिराजवळ, गंगानगर, आकुर्डी, पुणे) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मयत सनि आणि विजय हे
मुंबई बेंगलोर हायवेच्या आरसीसी क्रॅश बॅरीअरला बॅरिकेट्स करुन रंग देण्याचे काम करत होते.
त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या कारने दोघांना धडक दिली. यामध्ये एक जण कारच्या बोनेटवरुन पुलाच्या कठड्यावरुन
40 फूट खाली फेकला गेला. तर एकजण पुलापासून 30 फूट खाली रस्त्यावर फेकला गेला.
यामध्ये दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ओलेकर करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap Case | मंडल अधिकारी घेतात हॉटेलमध्ये तर तलाठी कार्यालयात; वारसांची नावे लावण्यासाठी लाच घेताना एकाचवेळी केली दोन ठिकाणी कारवाई

Pune ACB Trap News | पुणे : लाच घेताना पुण्यातील महसूल सहाय्यक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

MLA Anil Babar Death | शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे निधन

Gang Rape In Pune | खळबळजनक! पुण्यात 15 वर्षाय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक

Pune Loni Kalbhor Crime | पुणे : आधार कार्ड काढून देण्याच्या बहाण्याने नेऊन तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक