Pune Accident News | भरधाव क्रेनच्या धडकेत युवकाचा मृत्यू, चिखली परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव वेगात जाणाऱ्या क्रेनची धडक रस्त्यावरून जाणाऱ्या एका युवकाला बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात (Pune Accident News) रुपीनगर तळवडे येथील हुमा बेकरी जवळ 14 जानेवारी रोजी रात्री आठच्या सुमारास झाला आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांनी क्रेन चालकावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

उमेश रमेश भोसले (वय-36) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी क्रेन क्रमांक एमएच 14 एचके 1260 वरील चालकावर आयपीसी 304अ, 338 सह मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बाळासाहेब संदिपान जाधव (वय-28 रा. रोशनपुरी, ता. माजलगाव, जि. बीड) यांनी गुरुवारी (दि.18) चिखली पोलीस ठाण्यात (Chikhli Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत उमेश भोसले हे फिर्यादी यांचे दाजी आहेत. घटनेच्या दिवशी उमेश भोसले हे रोडने जात होते. त्यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील क्रेन हयगयीने व निष्काळजीपणाने बेदरकारपणे भरधाव वेगात चालवली. यामुळे फिर्यादी यांच्या दाजींना पाठीमागून धडक बसली. यामुळे उमेश भोसले हे खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. तसेच त्यांच्या उजव्या पायावरुन क्रेन गेल्याने भोसले गंभीर जखमी होऊन जागीच बेशुद्ध झाले. यातच त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

HSC Exam Admit Card | १२ वीच्या विद्यार्थ्यांना ‘या’ तारखेपासून उपलब्ध होणार परीक्षेचे प्रवेशपत्र

PM Narendra Modi | पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोलापुरात १५ हजार, तर राज्यात ९० हजार घरांचे वाटप