HSC Exam Admit Card | १२ वीच्या विद्यार्थ्यांना ‘या’ तारखेपासून उपलब्ध होणार परीक्षेचे प्रवेशपत्र

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे MSBSHSE Maharashtra Board (राज्य मंडळ) बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत लेखी परीक्षा होणार आहे, तर तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २ ते २० फेब्रुवारी या दरम्यान घेतली जाणार आहे. (HSC Exam Admit Card)

त्यायानुसार, राज्य मंडळाकडून २२ जानेवारीपासून प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव डॉ. अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

राज्य मंडळाने प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, कनिष्ठ महाविद्यालयांनी कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता प्रवेशपत्राची प्रत डाऊनलोड करून त्यावर प्राचार्यांचा शिक्का मारून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायची आहे. प्रवेशपत्रात विषय, माध्यमाबाबत बदल असल्यास त्याच्या दुरुस्त्या शाळा- कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यायच्या आहेत.

प्रवेशपत्रावरील विद्याथ्र्याचे नाव, छायाचित्र, स्वाक्षरी या बाबतच्या दुरुस्त्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवायची आहे. छायाचित्र सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचे छायाचित्र चिकटवून प्राचार्यांनी त्यावर शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे. प्रवेशपत्र गहाळ झाल्यास शाळा-महाविद्यालयांनी पुन्हा प्रवेशपत्राची प्रत घेऊन त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा मारून ती विद्यार्थ्यांना द्यायची आहे, असे यात पत्रकार नमूद केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Public Holiday In Maharashtra | राज्य सरकारचा मोठा निर्णय! राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर

NCP Jitendra Awhad | १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस बंद, ही तर हुकूमशाही, जितेंद्र आव्हाडांचा केंद्रावर निशाणा