Pune Alandi Accident News | डंपरचे चाक डोक्यावरुन गेल्याने महिलेचा मृत्यू, आळंदी येथील घटना

आळंदी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Alandi Accident News | आळंदी शहरामध्ये सकाळी 7 ते रात्री 10 यावेळेत जड वाहनांना प्रवेश बंदी आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करुन वाहन चालक आळंदीमध्ये वाहतूक करत आहेत. यामुळे लहान मोठे अपघात होत असतात. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने काही जणांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत. शनिवारी (दि.10) सकाळी एका भरधाव वेगातील डंपरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. (Pune Alandi Accident News)

प्रीती योगेश धुमाळ (वय-32) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. हा अपघात तीर्थक्षेत्र आळंदीत पद्मावती रस्त्यावरील ओम गुरुदेव मंगल कार्यालयाजवळ झाला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रीती धुमाळ पद्मावती रोडने आपल्या मुलासह दुचाकीवरुन जात होत्या. ओम गुरुदेव मंगल कार्यालयाजवळ भरधाव वेगात आलेल्या डंपरची धडक प्रीती यांच्या दुचाकीला बसली. यामुळे त्या डंपरच्या चाकाखाली आल्या. डंपरचे चाक डोक्यावरुन गेल्याने त्यांचा जागच मृत्यू झाला. सुदैवाने त्यांच्या सोबत असलेला चिमुकला बचावला. प्रीती धुमाळ या चाकण रोडवरील इंद्रायणी हॉस्पिटलमध्ये कर्मचारी म्हणून काम करत होत्या. त्यांच्या पश्चात पती व दोन लहान मुले आहेत.

घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान आळंदी शहरात सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत जड वाहनास प्रवेश बंदी आहे.
असे असतानाही जड वाहने बिनधास्तपणे ये-जा करत असल्याचे पाहायला मिळते.
मागील काही दिवसांपूर्वी याच परिसरात अवजड वाहनांखाली जाऊन दोन जणांचा मृत्यू झाला होता.
आजच्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून पोलिसांनी वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Wanwadi Crime | पुणे : फेसबुकवर मैत्री, प्रेमाच्या जाळ्यात ओढून बलात्कार

पुणे : निवृत्त पोलीस निरीक्षकाच्या हत्येच्या प्रयत्नातील आरोपीला काही दिवसातच जामीन मंजूर

पुणे : रस्त्यालगत लघुशंका केल्याच्या कारणावरुन वार, दोघांना अटक