Pune Alandi Crime | ‘मी इथला भाई, हफ्ते द्या…’ आळंदीत पिस्तुलाचा धाक दाखवत स्वयंघोषित भाईची दहशत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Alandi Crime | आळंदी येथे एका तरुणाने पिस्तुलाचा धाक दाखवत नागरिकांना ‘मी इथला भाई आहे. मला हप्ते द्या’ अशी धमकी दिली. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी (Alandi Police) गुन्हा दाखल करून स्वयंघोषित भाईला अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 19) रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास आळंदी येथे करण्यात आली.

ओंकार नवनाथ भोसले (वय 18, रा. चऱ्होली बुद्रुक, ता. हवेली) याच्यावर आर्म अॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंनमेंट अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार बाळासाहेब विष्णु खेडकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओंकार भोसले याने हातात पिस्तूल घेऊन आळंदी मधील चार नंबर शाळेजवळ
येत लोकांना धमकी दिली. ‘मी इथला भाई आहे. मला हप्ते द्या’, असे म्हणत त्याने परिसरात दहशत पसरवली.
पोलिसांनी ओंकार भोसले याच्याकडून एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण तीस हजार रुपयांचा
मुद्देमाल जप्त केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लोहार करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | भोगवटा पत्र मिळताच नवीन मिळकत येणार ‘करा’च्या कक्षेत ! बांधकाम विभाग, महावितरण आणि पाणी पुरवठा विभागाची माहितीही होणार शेअर

पुणे: गुन्हे शाखेकडून राजधानी दिल्लीत छापेमारी, 400 किलो ‘एमडी’ जप्त; पुणे पोलिसांकडून तब्बल 2200 कोटी रुपयांचे 1100 किलो एमडी (MD) जप्त (Videos)

Pune PMC News | …तोपर्यंत देवाची उरूळी येथील बायोमायनिंगचे काम सुरू करा – महापालिका आयुक्त विक्रम कुमार