Pune PMC News | भोगवटा पत्र मिळताच नवीन मिळकत येणार ‘करा’च्या कक्षेत ! बांधकाम विभाग, महावितरण आणि पाणी पुरवठा विभागाची माहितीही होणार शेअर

महापालिका सीएसआरच्या माध्यमातून तयार करत आहे ‘ऍप’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune PMC News | नवीन मिळकती कराच्या कक्षेत आणण्यासाठी आता Pune Municipal Corporation (PMC) महापालिकेचा बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग आणि महावितरण हे विभाग ऑनलाईन एकत्रित जोडले जाणार आहे. यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर सीएसआरच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. यामुळे नवीन मिळकती या भोगवटा पत्र दिल्यानंतर अल्पावधीत मिळकत कराच्या कक्षेत आणण्यासोबतच महावितरणलाही वीज मीटर वापराची माहिती मिळेल, असा दावा अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमनार (Dr Kunal Khemnar) यांनी केला आहे.(Pune PMC News)

महापालिकेच्या मिळकत कर संकलन आणि आकारणी या विभागामार्फत मिळकत कर वसुलीचे काम केले जाते. महापालिकेच्या सर्वात जास्त उत्पन्न मिळवून देणार्‍या या विभागाकडे मात्र, पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध नाही. शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक आणि निवासी स्वरुपाच्या इमारती उभ्या राहत आहे. तसेच पुण्यात सदनिकांच्या विक्रीत वाढ झाल्याचे निरीक्षणही नोंदविले गेले आहे. यापार्श्वभुमीवर महापालिकेकडून नवीन मिळकतींवर मिळकत कराची आकारणी करण्यास विलंब होत आहे. मिळकत कर विभागाचे निरीक्षक संबंधित मिळकतीच्या ठिकाणी जाऊन पाहणी करून मिळकत कराची आकारणी करतात. त्यानंतर संबंधित मिळकतदाराला बिल पाठविले जाते. पुरेशा मनुष्यबळाअभावी हे काम होण्यास दोन वर्षाहून अधिक कालावधी लागतो. यामुळे सदनिका किंवा व्यावसायिक मिळकत खरेदी केल्यानंतर मालकास दोन वर्षानंतर मिळकत कराची बिले मिळू लागतात. दोन किंवा अधिक वर्षाचा मिळकत कर अधिक असल्याने संबंधितावर आर्थिक बोजा पडतो.

महापालिकेकडून यापुर्वी नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाशी मिळकत कर विभाग हा ऑनलाईन जोडला आहे. या मिळकतीच्या खरेदीचा दस्त नोंदविल्यानंतर त्याबाबतची माहीती महापालिकेच्या मिळकत कर विभागाला मिळते. त्याचप्रमाणे आता महापालिकेच्या बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग आणि महावितरण यांच्याशी मिळकत कर विभाग हा ऑनलाईन जोडला जाणार आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत दिली गेलेली परवानगी, बांधकाम पुर्णत्वाचा दाखला याची माहीती मिळकत कर विभागाला ऑनलाईन मिळेल. तसेच पाणी पुरवठा विभागामार्फत दिला गेलेला पुरवठा हा निवासी वापराचा आहे की व्यावसायिक वापराचा आहे, याची माहीती मिळकत कर विभागाला तत्काळ मिळणे शक्य होणार आहे. तसेच महावितरणकडून वीज जोड कधी आणि निवासी, घरगुती, औद्योगिक कोणत्या स्वरुपाचा आहे याची माहीती मिळणार आहे. त्या आधारे नवीन मिळकती या मिळकत कराच्या कक्षेत आणणे सोपे होईल.

  • काय फायदा होणार ?
  • मिळकती कराच्या कक्षेत लवकर येण्यास मदत
  • ऑफलाईन प्रमाणेच ऑनलाईन काम झाल्याने कर्मचार्‍यांवरील ताण कमी होणार
  • मिळकत कराचे उत्पन्न वाढण्यास मदत
  • कर आकारणी वेळेत झाल्याने मिळकतदारवर आर्थिक बोजा येणार नाही.

मिळकत कर विभाग, बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग आणि महावितरण हे ऑनलाईन जोडण्यात येणार आहे. त्यासंदर्भात संबंधित विभागांची चर्चा झाली आहे. याकरीता आवश्यक सॉफ्टवेअरफ सीएसआरच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. ते लवकरच मिळणार आहे.

  • डॉ. कुणाल खेमनार, अतिरीक्त आयुक्त , पुणे महापालिका.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : बँकेतून पसरस्पर पैसे काढून ज्येष्ठ दाम्पत्याची सव्वा कोटीची फसवणूक

होंडा शोरुममध्ये चोरीचा प्रयत्न, सराईत गुन्हेगाराला रंगेहात पकडले; वाघोली परिसरातील घटना

पुणे : घराच्या खिडकीत घुसल्या गोळ्या, ‘डीआरडीओ’च्या फायरिंग रेंजमधून गोळ्या आल्याचा अंदाज

Pune Bharti Vidyapeeth Police | भारती विद्यापीठ पोलिसांकडून रेकॉर्डवरील हिस्ट्रीशीटर गजाआड, घरफोडीचे 5 गुन्हे उघड

Wake Up Punekar Campaign | कोरेगांव पार्क, बंडगार्डन परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, वेकअप पुणेकर अभियानाला पहिले यश – माजी आमदार मोहन जोशी

Pune Wagholi Crime | होंडा शोरुममध्ये चोरीचा प्रयत्न, सराईत गुन्हेगाराला रंगेहात पकडले; वाघोली परिसरातील घटना

Ritaa India Foundation | रिता इंडिया फाऊंडेशनच्या वतीने “वित्तीय गुंतवणूक आणि संधी” कार्यशाळा संपन्न

Pune Kondhwa Crime | विभक्त राहणाऱ्या पत्नीवर ब्लेडने सपासप वार, कोंढवा येथील प्रकार