Pune Ambegaon Crime | दरोड्याच्या तयारीतील टोळी भारती विद्यापीठ पोलिसांकडून गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Ambegaon Crime | आंबेगाव येथील रहिवाशी भागात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून लोखंडी कोयते, मिरची पावडर, दोरी असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई बुधवारी (दि.3) मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास आंबेगाव खुर्द (Ambegaon Khurd) येथील हनुमान नगर मधील साई अपार्टमेंट समोर करण्यात आली.

दानिश हसन शेख (वय-22 रा. उत्रोली ता. भोर), तेजस दिलीप कदम (वय-21 रा. बालाजीनगर, पुणे), राहुल खेमचंद चौधरी (वय-21 रा. गणेश अपार्टमेंट, जांभुळवाडी रोड, आंबेगाव बु.), समीर चंद्रकांत पडवळ (वय-24 रा. शनिनगर, आंबेगाव बु.) यांना अटक केली आहे. त्यांचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहे. याबाबत पोलीस शिपाई धनाजी धोत्रे (वय-34) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपींवर आयपीसी 399, 402 सह महाराष्ट्र पोलीस कायदा, आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी दानिश शेख हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार (Criminal On Police Records) असून त्याच्यावर भोर, समर्थ, भारती विद्यापीठ, विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. (Pune Ambegaon Crime)

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी हद्दीमध्ये गस्त घालत होते.
त्यावेळी बातमीदार मार्फत आरोपी बाबत माहिती मिळाली.
त्यानुसार, पोलिसांनी हनुमान नगर येथील साई अपार्टमेंट जाऊन पाहिले असता आरोपी लपून बसलेले दिसले.
पोलिसांनी छापा टाकून चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता,
रहिवासी भागात दरोडा टाकणार असल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून लोखंडी कोयता, मिर्ची पावडर,
दोरी, दुचाकी असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पुढील तपास सहायक निरीक्षक परदेशी करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Wagholi Crime | वाघोली येथील बिवरी गावात दरोडा, चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी लुटला 16 लाखांचा ऐवज

Pune Water Crisis-Traffic Issue | आम्हाला प्यायला पाणी आणि कोंडीमुक्त रस्ते कसे देणार? लोकसंख्येच्या विस्फोटामुळे पुण्याच्या पाण्याचा आणि वाहतुकीचा प्रश्न अतिगंभीरतेच्या दिशेने

Pimpri Murder Case | पिंपरी : मित्राचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला मध्य प्रदेशातून अटक