Pune Ambegaon Crime | पुणे : संतापजनक! रोडरोमियोच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Ambegaon Crime | मागील अनेक दिवसांपासून शाळा व क्लासला जाताना रोडरोमीयोंनी 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग केला. तसेच तिचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल (Photo Viral On Social Media) करण्याची धमकी दिली. रोडमियोंच्या सततच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Attempt To Suicide) केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरात घडली आहे. ही घटना आंबेगाव येथे 13 मार्च 2024 रोजी घडली आहे.(Pune Ambegaon Crime)

याबाबत पीडित मुलीच्या 50 वर्षीय वडिलांनी भारती विद्यापीठ पोलीस (Bharti Vidyapeeth Police Station) ठाण्यात मंगळवारी (दि.26) फिर्याद दिली आहे. यावरुन अजिंक्य आवटे (रा. भोसरी) व सुजल खुणे (रा. आंबेगाव पठार) यांच्यावर आयपीसी 354(ड), 506, 34 सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Molestation Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 17 वर्षाच्या मुलीला आरोपी जानेवारी 2024 पासून त्रास देत आहेत.
मुलगी शाळा व क्लासकरीता जात-येत असताना आरोपींनी तिच्याशी सतत सोशल मीडिया व प्रत्यक्ष पाठलाग करुन
त्रास दिला. तिच्या नकळत तिचे फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
त्यामुळे मुलगी तणावात होती. 13 मार्च रोजी मुलीने मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनाली मिठारे (PSI Sonali Mithare) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shirur Lok Sabha Election 2024 | शिवाजीराव आढळराव पाटील हे महायुतीचे ‘नाईलाजास्तव’ लादलेले उमेदवार ! अजित पवारांना उमेदवार आयात करावा लागतो हे शरद पवार यांचे नेतृत्व सिद्ध करते – डॉ. अमोल कोल्हे

Shivsena UBT Loksabha Candidates | लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर, मावळमधून संजोग वाघेरे, कोण आहेत ‘हे’ 17 उमेदवार?

Sanjay Raut On Mahayuti | महायुतीच्या नेत्यांवर संजय राऊतांचा हल्लाबोल, गुलाम, मांडलिक, आश्रितांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात, वंचितबाबत म्हणाले…

Pune Lok Sabha | पुणे लोकसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट? धंगेकर-मोहोळ यांच्या समोर वसंत मोरे ठरू शकतात मोठे आव्हान, कारण…

Pune Crime Branch | केमिकल ताडी तयार करण्यासाठी लागणारे क्लोरल हायड्रेटचा कारखाना उद्धवस्त; पुणे पोलिसांची संगमनेरमध्ये मोठी कारवाई (Video)