पुणे : – बिबवेवाडी येथील गंगाधाम चौकातील (Gangadham Chowk, Bibvewadi) आनंदनगर झोपडपट्टीचे त्याच जागेवर एस.आर.ए. योजनेअंतर्गत पुनर्वसन (Pune Anand Nagar SRA Scheme) हे एस.आर.ए. Slum Rehabilitation Authority (SRA) विकसक स्टार कन्स्ट्रक्शनमुळेच (Star Construction Pune) दिर्घकाळ रखडल्याचे समोर येत आहे. अशातच गंगाधाम चौकामध्ये बड्या बांधकाम व्यावसायीकांच्या गृहप्रकल्पासह, होलसेल मार्केटला परवानगी दिल्यानंतर या झोपडपट्टीच्या जागेतून २४ मीटर रुंदीचा रस्ता आखल्याने एस.आर.ए. योजनेचा गाशा गुंडाळावा लागल्याने आनंदनगर येथील झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसनाचा ‘खेळखंडोबा’ झाल्याचे समोर येत आहे. (Pune Anand Nagar SRA Scheme)
गंगाधाम चौकातील आनंदनगर झोपडपट्टीतील नागरिकांची घरे पाडण्यावरून मागील आठवड्यात भाजपचे आमदार (BJP MLA Pune) आणि स्थानीक नगरसेवक (BJP Corporators), नातेवाईक आणि झोपडपट्टीवासियांमध्ये वाद झाला. आमदार आणि नगरसेवकांनी शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी नागरिकांनी पोलिस आयुक्तांकडे (Pune Police) तक्रारही केली. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेसनेही (Congress) याबाबत चौकशीची मागणी केली. नागरिकांनी एस.आर.ए.चे अधिकारी आणि बांधकाम व्यावसायीकांनी फसवणूक केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली. परंतू पोलिसही त्यांना दाद देत नसल्याने नागरिक हवालदील झाले आहेत. (Pune Anand Nagar SRA Scheme )
यासंदर्भात माहिती घेतली असता, २००५ मध्ये आनंदननगर या महापालिका Pune Municipal Corporation (PMC) घोषित झोपडपट्टीचे त्याच जागेवर पुनर्वसन करण्यासाठी एस.आर.ए.ची मंजुरी मिळाली.
स्टार कन्स्ट्रक्शनचे मालक राकेश मोतीलाल शर्मा हे ही एस.आर.ए. विकसित करणार होते.
झोपडपट्टीवासियांची संमती व सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी ही शर्मा यांच्याकडेच होती.
विशेष असे की त्यावेळी या झोपडपट्टी मागील जागेवर जेथे सध्या गृहप्रकल्पाचे व होलसेल मार्केटचे काम सुरू आहे,
त्या जागेचे प्रकरण दिर्घकाळ न्यायालयामध्ये होते.
साधारण सात ते आठ वर्षांपुर्वी न्यायालयामध्ये गृहप्रकल्प व होलसेल मार्केटच्या जागेचा त्यांच्याबाजूने निकाल लागल्यानंतर येथील प्रकल्पांना महापालिकेने मंजुरी दिली.
यानंतर महापालिकेने प्रथम झाला कॉम्प्लॅक्स येथून डोंगराच्या लगत आशापूरा मंदिर पर्यंत पर्यायी ३० मी. रुंद रस्त्याच्या आखणीला मान्यता दिली.
२०१९ मध्ये ही मान्यता रद्द करून डिसेंबर २०२१ मध्ये याच ठिकाणावरून २४ मी. रुंदीच्या रस्त्याची आखणी केली.
गंगाधाम चौक ते कात्रज- कोंढवा रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून या रस्त्याचा वापर होणार आहे.
या रस्ता आखणीमुळे आनंदनगर झोपडपट्टीच्या पुनर्वसनाच्या एस.आर.ए. स्किमसाठी जागाच उरली नाही.
जी जागा उपलब्ध आहे, त्यावर इमारत उभारणीसाठी जागा शिल्लक नसल्याने हा प्रकल्प करणे शक्य नसल्याचे एस.आर.ए.चे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी महापालिकेला कळविले आहे.
त्यामुळे झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी महापालिकेवर येउन पडली आहे.
दरम्यान, भाजपच्या स्थानीक लोकप्रतिनिधींनी यामध्ये फारच ‘इंटरेस्ट’ घेउन यापैकी काही झोपडपट्टीवासियांचे येथून दोन कि.मी. अंतरावरील बिबवेवाडी हिलटॉप- हिलस्लोपच्या आरक्षित जागेवर बेकायदेशीररित्या पाच मजली इमारती बांधून पुनर्वसन केले आहे. हे पुनर्वसन बेकायदेशीर असल्याने काही नागरिकांनी जोरदार आक्षेप घेत मागील आठवड्यात झोपडया तोडण्यासाठी आलेल्या विकसकांच्या कर्मचार्यांना विरोध केला. काही वेळातच आमदार आणि स्थानीक नगरसेवक तेथे आले. नागरिकांची मागणी रास्त असताना त्यांनी उलट विरोध करणार्यांनाच शिवीगाळ आणि मारहाण केल्याचे समोर आले आहे.
आनंदनगर वसाहतीतून महापालिकेने कलम २०५ नुसार आखलेला रस्ता प्रामुख्याने मागील गृहप्रकल्प आणि होलसेल मार्केटच्या विकसकाच्याच जागेतून जाणार आहे.
या रस्त्याचा सर्वाधीक फायदा हा या व्यावसायीकांना होणार आहे.
यानंतरही महापालिका या विकसकांना रस्त्याच्या जागेच्या बदल्यात एफ.एस.आय. अथवा टी.डी.आर. देणार आहे.
तसेच हा रस्ता पीपीपी तत्वावर विकसित करण्यात येणार असून प्रामुख्याने या व्यावसायीकांमार्फतच तो विकसित केल्याचे संकेत मिळत आहेत.
यामुळे स्वत:च्या फायद्यासाठी होणार्या रस्त्याच्या मोबदल्यासोबतच रस्त्याच्या कामाचे पैसे देखिल संबधित बांधकाम व्यावसायीकाला होणार आहे.
यामुळे महापालिकेतील सत्ताधार्यांनी आणि त्यांना साथ देणार्या विरोधकांनी पालिकेच्या हितापेक्षा बांधकाम व्यावसायीकाचेच हित पाहिल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
यासोबतच गंगाधाम चौकातील वाहतूक कोंडी सुटावी यासाठी मार्केटयार्ड ते कात्रज कोंढवा रस्त्याकडे जाण्यासाठी उड्डाणपुल तसेच बिबवेवाडीहून कोंढव्याकडे (Bibvewadi To Kondhwa Road) जाण्यासाठी ग्रेडसेपरेटरही पीपीपी तत्वावर क्रेडीट नोटच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे.
या परिसरातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी, यासाठी उड्डाणपुल, भुयारी मार्ग आणि रस्ता तयार करण्यात येत असल्याचे महापालिकेतील सत्ताधारी भाजप ठासून सांगत आहेत.
आनंदनगर येथील झोपडपट्टीच्या जागेतून महापालिकेने २४ मीटर रस्ता आखल्याने पुर्वी मंजूर झालेल्या एस.आर.ए. योजनेसाठीचा प्लॉट नॉन बिल्डेबल झाला आहे. योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर वेळेत पुर्तता करण्याची जबाबदारी ही संबधित विकसकाची होती. प्लॉट नॉन बिल्डेबल झाल्याने तेथे योजना होणार नाही, याबाबत महापालिकेला कळविण्यात आले आहे.
– राजेंद्र निंबाळकर, आयुक्त, एस.आर.ए. (Rajendra Nimbalkar, Commissioner, SRA)
हिल टॉप हिल स्लोपवर बेकायदा बांधकाम करून तेथे झोपडपट्टी वासियांचे पुनर्वसन झाले असल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
यासंदर्भात पुढील आठवड्यात संबधित विभाग, एस.आर.ए.चे अधिकारी यांच्यासोबत बैठक बोलविण्यात आली आहे.
या बैठकीनंतर पुढील दिशा ठरविण्यात येईल.
झोपडपट्टी वासियांचे कायदेशीररित्या पुनर्वसन करण्यास महापालिकेचे प्राधान्य राहील. – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त.
Web Title :- Pune Anand Nagar SRA Scheme | Pune Anand Nagar SRA Scheme Slum Rehabilitation Authority (SRA) Star Construction Pune BJP MLA Corporators Rajendra Nimbalkar, Commissioner
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Ajit Pawar | अजित पवार पुन्हा पक्षावर नाराज आहेत का? पत्रकार परिषद घेऊन दिले स्पष्टीकरण
Gold-Silver Rate | पितृपक्षामुळे देशभरात व्यवसायात 10 टक्के घट, सोने-चांदीत सर्वात जास्त घसरण