Pune Balotsav PMC | पुणे महापालिकेच्यावतीने १४ ते १७ डिसेंबरला सारसबागेत ‘बालोत्सवाचे’ (Kid’s Festival) आयोजन

सहा वर्षाखालील पालकांनी पाल्यासह सहभागी व्हावे; अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Balotsav PMC | पुणे महापालिकेच्यावतीने येत्या १४ ते १७ डिसेंबर दरम्यान सारसबागेमध्ये शिशुगटातील अर्थात सहा वर्षे वयापर्यंतच्या मुलांसाठी बालोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वॅन लिअर फाउंडेशन या स्वंयसेवी संस्थेच्या सहकार्याने आयोजित या बालोत्सवामध्ये विविध खेळ, कला, मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून मुलांचे आरोग्य,आहार आणि कौशल्य विकासासाठी पालकांसाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शन वर्गाचे देखिल आयोजन करण्यात आले आहे. या बालोत्सवामध्ये पालकांनी आपल्या सहा वर्षांपर्यंतच्या पाल्यांसह मोठ्यासंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे (Vikas Dhakane) यांनी केले आहे. (Pune Balotsav PMC)

महापालिकेच्यावतीने बालोत्सव आयोजित करण्याचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. मागील वर्षी पाच विविध ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. यंदा सारसबागेमध्ये सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत हा उपक्रम होईल. या उपक्रमाअंतर्गत मुलांसाठी जादुचे खेळ, ओरिगामी, बाहुल्यांचा खेळ, मातीची भांडी बनविणे, वाळूतील खेळ, चित्रकला यासोबतच मुलांमध्ये कलात्मकता आणि कल्पनाशक्ती वाढविण्यासाठी खेळांतून विकासाचे कार्यक्रम आयोजीत करण्यात येणार आहेत. तसेच पालकांसाठी बालविकासाबदद्दल व प्रतिसादात्मक पालकत्वाबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. (Pune Balotsav PMC)

या उपक्रमासाठी शहरातील अंगणवाड्या आणि बालवाड्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
तसेच यंदा प्रथमच गतीमंद मुले आणि त्यांच्या पालकांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.
लहान मुलांचे कान, डोळे आणि ह्दयविकाराच्या आराजांबद्दल सल्ला आणि पुढील उपचारांबाबत मार्गदर्शन आणि
प्रत्यक्षात मदत करण्यासाठी शहरातील प्रतिष्ठित रुग्णालयांतील तज्ज्ञही याठिकाणी उपस्थित राहाणार आहेत.
या उपक्रमात नागरिकांनी आपल्या सहा वर्षापर्यंतच्या पाल्यासह आवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन ढाकणे यांनी केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

भोसरीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, डोळा मारुन ओढले मिठीत; तरुणाला अटक

पूर्ववैमनस्यातून तलवारीने वार, चार जणांना अटक; सहकारनगर परिसरातील घटना