Pune Bhosari MIDC Land Scam | एमआयडीसी जमीन प्रकरण : एकनाथ खडसे यांची ‘ती’ याचिका हायकोर्टाने फेटाळली, अडचणी वाढल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Bhosari MIDC Land Scam | पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील कथित जमीन गैरव्यवहार (Pune Bhosari MIDC Land Scam) प्रकरणी एसीबी (Anti-Corruption Bureau Maharashtra) ने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका आता न्यायालयाने फेटाळल्याने खडसे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. (Pune Bhosari MIDC Land Scam)

या प्रकरणी उच्च न्यायालयाकडून आजपर्यंत खडसे यांना कठोर कारवाईपासून दिलासा मिळाला होता. मात्र, आता उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली आहे. या प्रकरणात एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे, जावई गिरीश चौधरी आणि इतर काहीजण आरोपी आहेत. दोन वर्षांच्या कारावासानंतर गिरीष चौधरी हे सध्या जामीनावर आहेत. त्यांना नुकताच जामिन मिळाला आहे.

२८ एप्रिल २०१६ रोजी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी पुण्यातील
भोसरी एमआयडीसीतील सव्‍‌र्हे क्रमांक ५२/२ अ ही जमीन मूळ मालक अब्बास रसुलभाई उकानी यांच्याकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली होती. या व्यवहाराची नोंदणी निबंधक कार्यालयात रीतसर करण्यात आली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यातील आणि त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झाले आहेत.

या व्यवहारात गिरीश यांनी पाच शेल कंपन्यांकडून आलेला पैसा वापरल्याचे कागदोपत्री निष्पन्न झाल्याचे तपास
यंत्रणांनी म्हटले आहे. या सर्व व्यवहारात राज्य सरकारचे सुमारे ६१ कोटी रुपयांचे महसुली नुकसान झाल्याचे
यंत्रणांनी म्हटले आहे. या प्रकरणात गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावून अटक
केली होती. एकनाथ खडसे यांचीही याप्रकरणी चौकशी झाली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC Employees News | महापालिका व शिक्षण मंडळ अधिकारी कर्मचार्‍यांसाठी दसर्‍यापुर्वीच दिवाळीची गोड भेट; ‘एवढं’ सानुग्रह अनुदान जाहीर