Pune Bibvewadi Crime | पुणे : पोलिसांना टिप देत असल्याच्या संशयावरुन तरुणाला मारहाण, सराईत गुन्हेगारासह दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Bibvewadi Crime | पोलिसांना टिप देत असल्याच्या संशयावरुन दोघांनी एका तरुणाला लाकडी दांड्याने मारहाण करुन जखमी केले. तसेच हातातील लाकडी दांडके हवेत फिरवून लोकांना धमकी देऊन परिसरात दहशत माजवली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी (Bibvewadi Police Station) एका सराईत गुन्हेगारासह दोघांना अटक केली आहे (Two Criminal Arrest). हा प्रकार सोमवारी (दि.11) रात्री पावणे बाराच्या सुमारास बिबवेवाडी येथील स्वामी विवेकानंद रोडवर घडला आहे.

याबाबत स्वप्नील रविंद्र कांबळे (वय-24 रा. राजीव गांधीनगर, हुनमंत चाळ, बिबवेवाडी, पुणे) याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन गौरव मारुती खंडाळे (वय-25 रा. साईनगर गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज शाळेजवळ, कोंढवा, पुणे), केतन शाम टेमकर (वय-20 रा. हनुमान चाळ, राजीव गांधीनगर, बिबवेवाडी, पुणे) यांच्यावर आयपीसी 326, 506, 34 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. आरोपी केतन टेमकर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.(Pune Bibvewadi Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वप्नील व त्याचा मित्र स्वामी विवेकानंद रोडवरील भारत वाईन्स
या दुकानासमोर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी फिर्यादी याच्या ओळखीचे आरोपी त्याठिकाणी आले.
गौरव याने फिर्यादी यांना तू मुसाला का मारले अशी विचारणा केली. तर केतन याने माझी पोलिसांना टिप देतो का असे
म्हणून गौरवने लाकडी दांडक्याने मारण्यास सुरुवात केली. तर केतन याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले.
केतन याने गौरवच्या हातातील लाकडी दांडके हातात घेऊन त्या ठिकाणी जमलेल्या लोकांच्या दिशेने फिरवून धमकी दिली.
त्यामुळे मदतीसाठी आलेले लोक घाबरुन पळून गेले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Muralidhar Mohol – MLA Ravindra Dhangekar | पुण्यात मोहोळ विरूद्ध धंगेकर सामना रंगणार?, काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष

Mahavikas Aghadi-Lok Sabha Election 2024 | ”महाविकास आघाडीचे जागावाटप पूर्ण, ४८ लोकसभा मतदारसंघांची…”, संजय राऊत यांची महत्वाची माहिती

NCP Sharad Pawar On Modi Govt | ”भाजपाच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांची स्थिती बिकट”, शरद पवार यांचा मोदी सरकारवर आरोप