Pune Bibvewadi Crime | पुणे : मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलेल्या युवकावर कटरने वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Bibvewadi Crime | मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलेल्या युवकावर फळ कापण्याच्या कटरने वार करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार बुधवारी (दि.27) बिबवेवाडी येथील कोंढवा जंक्शन चौकात (Kondhwa Junction Chowk) घडला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी (Bibvewadi Police) तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत रमेश गोपी राठोड (वय-37 रा. लोहगाव रोड, पुणे) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी पवन लालासाहेब आव्हाळे (Pawan Lalasaheb Avhale), विकास राजाभाऊ भिडे (Vikas Rajabhau Bhide), गोट्या भालेराव (Gotya Bhalerao) यांच्यावर आयपीसी 326, 323, 504 महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी बिबवेवाडी येथे राहणाऱ्या मैत्रिला भेटण्यासाठी गेले होते. याच कारणावरुन आरोपींनी फिर्यादी यांना शिवागाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच आरोपीने फिर्यादी यांच्या पॅन्टच्या खिशातून फळ कापण्याचे कटर काढून फिर्यादी यांच्यावर वार करुन जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.(Pune Bibvewadi Crime)

शिवागाळ केल्याच्या कारणावरुन मारहाण

वारजे : मित्रासोबत गप्पा मारत बसले असताना शिवागाळ केल्याच्या कारणावरुन एका तरुणाला डोक्यात दगडाने मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार मंगळवारी (दि.26) रात्री नऊच्या सुमारास एन.डी.ए. ग्राउंड, शिवणे (NDA Ground Shivane) येथे घडला आहे. याबाबत आकाश प्रभु भगरे (वय-20 रा. शिवणे) याने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन मेहबुब रफिक मुल्ला (वय-19 रा. शिवणे) व त्याच्या इतर तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी आकाश याचा भाऊ व त्याचे मित्र आणि आरोपी गप्पा मारत बसले होते.
त्यावेळी आरोपीने फिर्य़ादी यांना तु मला शिवीगाळ का केली असे विचारत हातातील दगड डोक्यात मारुन जखमी केले.
तर त्यांची भांडणे सोडवण्यासाठी फिर्य़ादीचा भाऊ मध्ये आला असता त्याला देखील मुल्ला याच्या साथीदारांनी
शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Punit Balan Group | उद्योजक पुनीत बालन यांची लोणीतील विविध प्रकल्पांना भेट! (Video)

Sanjay Kakade | ‘राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे माझ्या वेदना व पुणे लोकसभेचे वास्तव मांडले’ – माजी खासदार संजय काकडे

Sharad Pawar NCP Group On Ajit Pawar | शरद पवार गटाची अजित पवारांवर खोचक टीका, ”…तर जुलमी सत्तेचं मांडलिकत्व स्वीकारावं लागत नाही, धाकदपट’शहां’ची…” (Video)

Rohit Pawar On Sunil Tatkare | रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर घणाघात, अजित पवारांची साथ सोडणारे ते पहिले व्यक्ती असतील

Bacchu Kadu On Navneet Rana | ”नवनीत राणांचा पराभव करणार”, उमेदवारी दिल्याने बच्चू कडू भाजपावर संतापले