Punit Balan Group | उद्योजक पुनीत बालन यांची लोणीतील विविध प्रकल्पांना भेट! (Video)

आर एम धारीवाल यांच्या नावाने वसतीगृह आणि इंद्राणी बालन यांच्या नावाने बहुउद्देशीय हॉल बांधण्याची घोषणा

आंबेगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Punit Balan Group | लोणी (ता. आंबेगाव जि. पुणे) येथे ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’च्या (Indrani Balan Foundation) माध्यमातून चालू असलेल्या विविध विकास प्रकल्पांना उद्योजक आणि ‘पुनीत बालन ग्रुप’ व ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’चे अध्यक्ष पुनीत बालन यांनी भेट देऊन पाहणी केली. (Punit Balan Group)

यावेळी त्यांनी आर.एम. धारीवाल (R.M. Dhariwal) नावाने लोणी गावात एक वसतीगृह आणि इंद्राणी बालन यांच्या नावाने बहुउद्देशीय हॉल बांधण्याची घोषणाही त्यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत पत्नी जान्हवी धारिवाल-बालन (Janhavi Dhariwal Balan) याही उपस्थित होत्या.

‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’च्यावतीने लोणी येथे भव्य शाळागृह इमारतीचे बांधकाम तसेच गावासाठी तीन कोटी लीटर पाणी साठवण क्षमतेचे तळे आणि त्याभोवती उद्यान विकसित करण्यात येत आहे. आर. एम. डी. फौंडेशनच्या (RMD Foundation) वतीने गावात दहा हजार वृक्ष लागवडही करण्यात येत आहे. या सर्व प्रकल्पांची पुनीत बालन आणि ‘आर.एम.डी. फाऊंडेशन’च्या कार्याध्यक्षा जान्हवी धारिवाल बालन यांनी पाहणी केली.

याप्रसंगी झालेल्या छोटेखानी समारंभात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी ढोल लेझीमच्या तालात पाहुण्यांचे अनोखे स्वागत केले. यावेळी पुनीत बालन आणि जान्हवी बालन-धारीवाल यांचा विशेष सत्कार करण्यात आला. लोणी हे गाव माझ्या परिवाराचाच एक भाग असून लोणीतील विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे यावेळी बोलताना पुनीत बालन यांनी नमूद केले. लोणी गाव हे हिरवाईने नटवण्यासाठी हवी तेवढी झाडे उपलब्ध करुन देतील असं आश्वासन यावेळी जान्हवी बालन-धारीवाल यांनी दिलं.

यावेळी क्रीडा स्पर्धेत यश मिळवणाऱ्या आठ विद्यार्थ्यांचा पुनीत बालन यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीचे अध्यक्ष उदयराजे वाळुंज यांनी उपस्थितांचे स्वागत केले. गृह विभागाचे सहसचिव कैलास गायकवाड (Kailas Gaikwad, Joint Secretary, Home Department, Maharashtra) , सरपंच डॉ. सावळाभाऊ नाईक, माजी सरपंच उद्धव लंके तसेच शाळेतील विद्यार्थिनी तनिष्का सोनार यांनीही मनोगत व्यक्त केलं. लोणी ग्रामपंचायतीच्या वतीने पुनीत बालन आणि जान्हवी बालन यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी प्रबोधिनीचे सदस्य बाळासाहेब गायकवाड, मयूर लोखंडे, राजेश वाळुंज, सुरेश वाळुंज, संतोष पडवळ, पुनीत बालन ग्रुपचे चेतन लोखंडे, समाजभूषण कैलास राव गायकवाड, अशोक वाळुंज, बाळशिराम वाळुंज, अशोक आदक पाटील, संदीप आढाव, प्रकाश वाळुंज, प्रकाश सोनवणे, कैलास सिनलकर, सुधीर सोनार, प्रशालेचे प्राचार्य सुभाष वेताळ तसेच शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अविनाश वाळुंज यांनी केले.

‘‘गावाचं गावपण टिकवून शहरातील सुविधांप्रमाणे पर्यावरणाचं संरक्षण करुन गावातही सुविधा उपलब्ध केल्या तर गावातील स्थलांतर रोखण्यास निश्चित मदत होईल. शिवाय शहरांवर येणारा ताणही कमी होईल. त्यादृष्टीने सामाजिक दायित्त्वाच्या भावनेतून गावासाठी शक्य ते करण्याचा माझा नेहमी प्रयत्न राहील आणि ग्रामस्थांचंही त्यासाठी सहकार्य राहील, असा विश्वास आहे.’’

पुनीत बालन (अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप)
Punit Balan (Chairman, Punit Balan Group)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Katraj Crime | पुणे : दुचाकी स्लीप होऊन नर्सरीतील कुंड्या फुटल्याने हत्याराने वार, दोघांना अटक

Sadanand Date | मराठी पाऊल पडते पुढे! पुण्याचे सुपुत्र सदानंद दाते NIA च्या महासंचालकपदी

Pune Mahavitaran News | सदाशिव पेठेतील खोदाई लेखी परवानगीसह चलन भरूनच: महावितरणकडून स्पष्टीकरण

Pune Chandan Nagar Crime | मालकाच्या घरात चोरी करणाऱ्या कामगाराला चंदननगर पोलिसांकडून अटक

Maharashtra Congress On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंवर काँग्रेस नाराज, ”चर्चा संपलेली नसताना उमेदवारी घोषित करणं हे आघाडी धर्माला गालबोट”

Baramati Lok Sabha Election 2024 | स्थलांतरीत कामगारांच्या मतदानासाठी कृतीयोजना तयार करा; बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी

Pune Lok Sabha Election 2024 | पुणे लोकसभेचे तिनही उमेदवार वाडेश्वर कट्ट्यावर, रंगली ‘चाय पे चर्चा’, शहराच्या विकासावर मांडले मत (Video)