Sharad Pawar NCP Group On Ajit Pawar | शरद पवार गटाची अजित पवारांवर खोचक टीका, ”…तर जुलमी सत्तेचं मांडलिकत्व स्वीकारावं लागत नाही, धाकदपट’शहां’ची…” (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Sharad Pawar NCP Group On Ajit Pawar | शिवचरित्र फक्त मिरवण्यापेक्षा अंगी जिरवलं तर जुलमी सत्तेचं मांडलिकत्व स्वीकारावं लागत नाही. धाकदपट’शहांची’ भीती वाटत नाही, अशी खोचक टीका करणारा अमोल कोल्हे यांच्या आवाजातील एक व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने ‘एक्स’वर शेअर केला आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी हळुहळु वेग घेऊ लागली असून आरोप-प्रत्यारोप, टीका-टीपण्णीने वातावरण तापू लागले आहे. अशातच पवार गटाने ही पोस्ट करत अजित पवार यांना डिवचले आहे. या व्हिडिओत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा (Amit Shah) खोचक शब्दांत उल्लेख केला आहे.(Sharad Pawar NCP Group On Ajit Pawar)

या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात जिथे तुमच्यात शिवचरित्र किती झिरपलं याचा कस लागतो. तेव्हा कच खाल्ली, मांडलिकत्व स्वीकारलं, धाकदपटशाहीला बळी पडलात तर मात्र अशांना हा लढवय्या महाराष्ट्र माफ करत नाही.

तर व्हिडीओमध्ये अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांची महानता सांगताना मांडलिकत्व पत्करलेल्या राजांचा उल्लेख करताना म्हणतात, मिर्झाराजे जयसिंग, राजा मानसिंग यांचा इतिहास फारसा कुणाला ठाऊक नाही. कारण ते मांडलिक होते.

व्हिडिओ पुढे म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा औरंगजेबाच्या दरबारात उभे होते, तेव्हा त्याला वाटत होतं
की छत्रपतींनी दख्खनची सुभेदारी घ्यावी. दख्खनचा सुभा स्वराज्याच्या आकारमानाच्या तीनपट होता.
त्या तुलनेने तेवढी संपत्ती होती. स्वराज्य दऱ्याखोऱ्यांचं राज्य. पण पण दख्खनचा सुभा म्हणजे मुबलक सुपीक प्रदेश.

त्याला मुगल सल्तनीच्या शहजाद्याचा मान-सन्मान होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला मुजरा
करून त्याचं मांडलिकत्व घेण्याऐवजी आपल्या मातीसाठी आणि आपल्या माणसांसाठी ताठ मानेनं संघर्षाची वाट निवडली.
म्हणूनच साडेतीनशे वर्षांनंतर आपण त्यांचं नाव घेतो.

तर व्हिडिओच्या शेवटी धाकदपट’शाहा’ असा शब्द वापरत अमित शाह यांचा उल्लेख केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Punit Balan Group | उद्योजक पुनीत बालन यांची लोणीतील विविध प्रकल्पांना भेट! (Video)

Sanjay Kakade | ‘राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे माझ्या वेदना व पुणे लोकसभेचे वास्तव मांडले’ – माजी खासदार संजय काकडे