Pune Bibvewadi Crime | पुणे : प्रेमप्रकरणातून महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या; बिबवेवाडीतील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Bibvewadi Crime | लग्न करण्यासाठी तगदा लावून मानसिक त्रास दिल्याने 20 वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास (Hanging Case) घेऊन आत्महत्या (Suicide Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 21 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी (Indira Nagar Bibvewadi) येथे घडला आहे. याप्रकरणी 25 वर्षीय प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे.

उत्कर्षा संतोष लोंढे (वय-20 रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे आत्महत्या केलेल्या महाविद्यालयीन तरुणीचे नाव आहे. तर आदित्य चंद्रकांत ढावरे Aditya Chandrakant Dhaware (वय-25 रा. केम. ता. करमाळा, जि. सोलापूर) याच्यावर आयपीसी 306 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत उत्कर्षाचे वडील संतोष गोकुळ लोंढे (वय-45 रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांनी मंगळवारी (दि.2) बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) फिर्य़ाद दिली आहे. (Pune Bibvewadi Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी उत्कर्षा हिचे मागील दोन वर्षापासून आदित्य ढावरे याच्यासोबत प्रेमसंबंध होते. त्यांच्या प्रमसंबंधाची माहिती फिर्य़ादी तसेच आदित्यच्या घरातील लोकांना होती. उत्कर्षाला शिक्षण पूर्ण झाल्यावर किंवा आदित्यला नोकरी लागल्यानंतर लग्न करायचे होते. तसे तिने फिर्यादी व आदित्यच्या घरच्यांना सांगितले होते. दरम्यान, आदित्यच्या आईचे आजारपणात निधन झाले.

घरातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच वर्षी लग्न केले नाही,
तर तीन वर्षे लग्न करता येत नसल्याची प्रथा आपल्या घरात असल्याची माहिती आदित्यने फिर्यादी व त्यांच्या मुलीला दिली.
आदित्याने उत्कर्षाकडे आत्ताच लग्न कर म्हणून तगादा लावला. तसेच सतत मानसिक त्रास दिला.
उत्कर्षाला आताच आदित्य सोबत लग्न करायचे नव्हते. मात्र आदित्यकडून वारंवार मानसिक त्रास दिला जात होता.
या त्रासाला कंटाळून उत्कर्षाने राहत्या घरातील किचन मधील फॅनला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विद्या सावंत (API Vidya Sawant) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Wagholi Crime | वाघोली येथील बिवरी गावात दरोडा, चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी लुटला 16 लाखांचा ऐवज

Pune Water Crisis-Traffic Issue | आम्हाला प्यायला पाणी आणि कोंडीमुक्त रस्ते कसे देणार? लोकसंख्येच्या विस्फोटामुळे पुण्याच्या पाण्याचा आणि वाहतुकीचा प्रश्न अतिगंभीरतेच्या दिशेने