Pune : लोणीकाळभोर आणि चतुःश्रृंगी परिसरात घरफोडया

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शहरातील बंद फ्लॅट फोडण्याचे सत्र सुरूच असून, विविध भागातील दोन फ्लॅट फोडत सव्वा तीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. चतुःश्रृंगी आणि लोणी काळभोर येथे या घटना घडल्या आहेत.

याप्रकरणी रोहित संजय खलसे (वय 30) यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पाषाण परिसरात शिवशक्ती चौक येथे देवाश सुपर मार्केट नावाचे किराणा मालाचे दुकान आहे. 7 ते 12 मे यादरम्यान या दुकानाचे शटर उचकटुन आत प्रवेश केला. तसेच रोकड व तेलाच्या पिशव्या असा एकुण 31 हजार 400 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे. तर दुसरी घटना उरळी देवाची येथे घडली आहे. 3 ते 9 मे या कालावधीत येथील संजय बाबासाहेब डोलताडे यांचे बंद घर फोडले आहे. फ्लॅट बंद असताना चोरट्यांनी फ्लॅट फोडत 2 लाख 95 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.