Pune Cantonment Vidhan Sabha | कॅन्टोमेंट विधानसभा मतदार संघातील सर्व गृहनिर्माण संस्थेत शनिवार, रविवारी विशेष मतदार नोंदणी अभियान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cantonment Vidhan Sabha | मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत २१४ कॅन्टोमेंट विधानसभा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रातील सर्व गृहनिर्माण संस्थांमध्ये शनिवार २२ व रविवार २३ जुलै रोजी विशेष मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. (Pune Cantonment Vidhan Sabha)

भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअंतर्गत मतदार संघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांद्वारा २१ जुलै ते २१ ऑगस्ट या कालावधीत प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये ज्या मतदारांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट नाहीत त्यांची नावे नमुना क्रमांक ६ मध्ये भरुन घेणे, कायमस्वरुपी स्थलांतरीत व मयत झालेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी नमुना क्रमांक ७ तर मतदार यादी किंवा मतदार ओळखपत्रातील त्रुटी दुर करण्यासाठी नमुना क्रमांक ८ भरुन घेतला जाणार आहे. (Pune Cantonment Vidhan Sabha)

मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:- नमुना क्रमांक ६ भरण्यासाठी अर्हता दिनाकांला वय वर्षे १८ पूर्ण होत असावे. निवासाच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, भारतीय पासपोर्ट किंवा राष्ट्रीयकृत बँकेचे पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत यापैकी एकाची आवश्यकता आहे. वयाच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, भारतीय पासपोर्ट, शाळा सोडल्याचा दाखला किंवा पॅन कार्ड यापैकी एकाची आवश्यकता आहे. नजीकच्या काळातील एक रंगीत पासपोर्ट आकाराचे पांढऱ्या रंगाची पार्श्वभूमी (बॅकग्राऊंड) असलेले छायाचित्र, मतदार भाडेकरू असेल तर नोंदणीकृत भाडे करार आवश्यक आहे.

(Voter List) मतदार यादीतून नाव वगळणेबाबत नमुना क्रमांक ७ साठी- मयत मतदार असेल तर मयताचा दाखला, लग्न होऊन सासरी गेलेल्या महिला व इतर मतदार संघात कायमस्वरूपी वास्तव्यास गेले असल्यास त्याचा पुरावा आवश्यक आहे.

मतदार यादीतील दुरुस्त्यांबाबत नमुना क्रमांक ८ साठी आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना,
भारतीय पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत यापैकी एक की ज्यामध्ये बदल करावयाचा उल्लेख
असेल असे कागदपत्र, तर एकाच मतदार संघात निवासाचे वास्तव्य बदलले असल्यास नमुना क्रमांक ८ अ भरण्यासाठी
आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, भारतीय पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत यापैकी एक की
ज्यामध्ये पत्ता बदल केल्याचा उल्लेख असेल अशा कागदपत्राची आवश्यकता आहे.

ज्या नवमतदारांना ऑनलाईन नावनोंदणी करावयाची असेल त्यांनी शासनाच्या https://voters.eci.gov.in या
वोटर्स सर्व्हिस पोर्टल व वोटर हेल्पलाईन ॲप (Voter Helpline App) या माध्यमांचा वापर करुन नवीन नाव नोंदणी करावी.
या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमात नागरिकांनी सहभाग घ्यावा आणि नवमतदारांनी नोंदणी करून घ्यावी,
असे आवाहनही उपजिल्हाधिकारी तथा २१४ कॅन्टोमेंट विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी
अधिकारी सिद्धार्थ भंडारे (Electoral Registration Officer Siddharth Bhandare) यांनी केले आहे.

Pune Ring Road | पुणे चक्राकार महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेला गती !