Pune Chandan Nagar Crime | पुणे : अल्पवयीन मुलीचे न्युड फोटो व्हायरल करणाऱ्या गुजरातमधील तरुणाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Chandan Nagar Crime | इंन्स्टाग्रामवर ओळख (Instagram Friend) वाढवून अल्पवयीन मुलीचे न्युड फोटो (Girl Nude Photos-Videos) व व्हिडिओ प्राप्त करुन ते सोशल मीडियावर व्हायरल (Viral On Social Media) करुन मुलीची बदनामी (Defamation Of Girl) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police) गुजरातमधील एका 19 तरुणावर आयटी अॅक्ट नुसार गुन्हा (IT Act) दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार 21 मार्च रात्री साडे आठ ते 22 मार्च सकाळी नऊ या कालावधीत ऑनलाईन घडला. (Pune Chandan Nagar Crime)

याबाबत खराडी (Kharadi) परिसरात राहणाऱ्या पीडित मुलीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन कल्पेश कालिदास खराडे
Kalpesh Kalidas Kharade (वय-19 रा. ए वन प्रियंका सिटी, गोडदरी-निलीगीरी रोड, सुरत, गुजरात) याच्यावर आयपीसी 507, 500, सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीसोबत सोशल मिडीयाच्या माध्यमातून इन्स्टाग्रावर व स्नॅपचॅट
वर ओळख केली. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या सोबत मैत्री केली.
आरोपीने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन पीडित मुलीसोबत वेळोवेळी चाटींग केली. तसेच मुलीचे न्युड फोटो व व्हडीओ प्राप्त केले.
यानंतर त्याने मुलीला ब्लॅकमेल करुन वारंवार न्युड फोटो पाठवण्यास सांगितले.
मुलीने फोटो पठवण्यास नकार दिल्याने आरोपीने त्याच्याकडे असलेले मुलीचे न्युड फोटो सोशल मीडियावर व्हायरल
करुन बदनामी केली. हा प्रकार मुलीच्या लक्षात आल्यानंतर तिने चंदननगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) पंडीत रेजितवाड (PI Pandit Rejitwad) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Parvati Crime | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी गजाआड

Kangana Ranaut-Mandi Lok Sabha | कंगना रनौतला भाजपकडून उमेदवारी जाहीर, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली…