Pune Parvati Crime | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Parvati Crime | चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित केले. हा प्रकार जनता वसाहत (Janta Vasahat) परिसरात फेब्रुवारी 2024 ते 14 मार्च 2024 या कालावधीत वारंवार घडला आहे. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी 21 वर्षाच्या तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Rape Case)

याबाबत पीडित मुलीच्या आईने रविवारी (दि.24) पर्वती पोलीस ठाण्यात फिर्य़ाद (Parvati Police Station) दिली आहे. यावरुन 21 वर्षाच्या मुलावर आयपीसी 376/2/एन/जे सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्य़ादी राहात असलेल्या घराच्या मालकाचा मुलगा आहे. आरोपीने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून घरात कोणी नसताना जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. आरोपीने वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. हा प्रकार फिर्यादी यांना समजल्यानंतर त्यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.(Pune Parvati Crime)

कात्रजमध्ये तरुणीवर बलात्कार

कात्रज (Katraj) : एका 19 वर्षीय तरुणीसोबत ओळख करुन तिला लग्नाचे आमिष दाखवले.
तरुणीला भेटण्यासाठी घरी बोलावून घेत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
हा प्रकार 7 मार्च ते 15 मार्च या कालावधीत आरोपीच्या राहत्या घरात घडला आहे.
याप्रकरणी स्वारगेट (Swargate) परिसरात राहणाऱ्या 19 वर्षीय मुलीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात
(Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन ओमकार कैलाश गिरी Omkar Kailash Giri
(वय-20 रा. कात्रज) याच्यावर आयपीसी 376/2/एन नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Ravindra Dhangekar On Muralidhar Mohol | ‘मोहोळ यांनी पहिलवानांना कधी अर्धा लिटर दूध दिले नाही; बिल्डरांना मात्र पाजले’ – रवींद्र धंगेकर (Videos)

Lok Sabha Election 2024 | भाजपाकडून एकनाथ शिंदेंची कोंडी? पाच खासदारांचे तिकीट कापणार? संजय शिरसाट म्हणाले…