Pune Chandan Nagar Police | चंदननगर: मोबाइल चोरणारे गुजरातमधील चोरटे अटकेत

पुणे : Pune Chandan Nagar Police | मोबाइल चोरणाऱ्या गुजरातमधील चोरट्यांना चंदननगर पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून आठ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. (Pune Crime News)

किरण अमरसिंग नटमारवाडी (वय १९), मांगी अमरसिंग नटमारवाडी (वय ४७, सध्या रा. तळेगाव दाभाडे, मूळ रा. जवाहरनगर, नडीयाद, गुजरात) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. किरण आणि त्याची मांगी यांनी बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांकडील मोबाइल चोरून नेले होते. चंदननगर भाजी मंडई परिसरात एक महिला आणि साथीदार चोरलेले मोबाइल विक्री करत असल्याची माहिती विकास कदम, नामदेव गडदरे यांना मिळाली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. तेव्हा मोबाइल चोरल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांच्याकडून आठ मोबाइल जप्त करण्यात आले. (Arrest In Mobile Theft)

ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील (ACP Sanjay Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष पाटील (Sr PI Manisha Patil), उपनिरीक्षक तानाजी शेगर (PSI Tanaji Shegar), अविनाश संकपाळ, विकास कदम, नामदेव गडदरे, श्रीकांत शेंडे, शेखर शिंदे यांनी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने 4 लाखांची फसवणूक