Pune Kothrud Crime News | हॉटेलला रेटिंग देण्याच्या अमिषाने 25 लाखांची फसवणूक

पुणे : हॉटेलला रेटिंग दिल्यास तसेच ट्रेडिंग केल्यावर चांगला नफा देण्याचा आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी २५ लाख रुपयांना गंडा घातला (Cyber Thieves). याबाबत सचिन भवानराव नाईक (वय- ५५, रा. कोथरूड) यांनी सायबर पोलिस ठाण्यात (Cyber Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६८/२४) दिली आहे. (Pune Cheating Fraud Case)

हा प्रकार ३१ जानेवारी ते २ मार्च २०२४ यादरम्यान घडला आहे. तक्रारदार यांना एका मोबाइलवरुन एक मेसेज आला. एका नामांकित कंपनीची एचआर बोलत असल्याचे सांगून पार्टटाइम जॉब ‘वर्क फ्रॉम होम’द्वारे चांगले पैसे कमावता येतील, असे सांगितले. हॉटेल आणि रेस्टोरंटला रेटिंग देण्याचे काम असल्याचे सांगून एका रेटिंगमागे १५० रुपये मिळतील, असे सांगितले. तक्रारदार यांनी काम करण्यास सहमती दिल्यावर त्यांना एका ग्रुपमध्ये ॲड केले. काही लिंक पाठवून देण्याचे काम करायला सांगितले. काम पूर्ण केल्यावर सुरुवातीला मोबदला देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर गुंतवणुक केल्यास आणखी नफा मिळेल असे आमिष दाखवून प्रीपेड टास्कच्या नावाखाली एकूण २५ लाख ४९ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यावर भरलेले पैसेही मिळत नसल्याचे पाहिल्यावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप देशमाने (Sr PI Sandeep Deshmane) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने 4 लाखांची फसवणूक