Pune Chaturshrungi Police | दिवसा घरफोडी करणारी मुंबईची टोळी चतु:श्रृंगी पोलिसांकडून गजाआड, 20 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Chaturshrungi Police | पुणे शहरात दिवसा घरफोडी (House Burglary) करुन लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेणाऱ्या मुंबईतील सराईत गुन्हेगारांच्या (Criminals Gang Of Mumbai) टोळीला चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या दोन आरोपींकडून 20 लाख 14 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम व इतर साहित्य जप्त केले आहेत.(Pune Chaturshrungi Police)

गुन्ह्याचा तपास करुन चतु:श्रृंगी पोलिसांनी नालासोपारा (Nala Sopara), पालघर (Palghar) येथून मोहमद रईस अब्दुल आहद शेख Mohammed Raees Abdul Ahad Shaikh (वय-37 रा. तैयबा मस्जिद जवळ, मालवणी, मुंबई), जोगेश्वरी पुर्व (Jogeshwari East) येथून मोहमद रिजवान हनीफ शेख Mohammad Rizwan Hanif Shaikh (वय-33 रा. जोगेश्वरी पुर्व, मुंबई) यांना अटक केली आहे.

23 फेब्रुवारी रोजी सकाळनगर, बाणेर रोड (Sakal Nagar Baner Road) परिसरात दोन ठिकाणी घरफोडी झाली होती. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही तपासले व तांत्रिक विश्लेषण केले. त्यावेळी आरोपी मुंबई परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने मुंबईत जाऊन दोघांना अटक केली. त्यांची पोलीस कस्टडी घेऊन सखोल चौकशी करुन मुंबई येथे जाऊन 30 तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन, गुन्ह्यात वापरलेली कटावणी, पोपट पाना व स्कू ड्रायव्हर असा एकूण 20 लाख 14 हजार 364 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अटक करण्यात आलेले आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminals On Police Records) आहेत.
मोहमद शेख याच्यावर 30 पेक्षा जास घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. तर मोहमद रिजवान शेख याच्यावर सहा पेक्षा
जास्त घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar), सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार
(IPS Pravin Pawar), अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील (IPS Manoj Patil), पोलीस उपायुक्त विजय मगर
(DCP Vijaykumar Magar), सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे (ACP Arti Bansode) यांच्या
मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी (Sr PI Ajay Kulkarni), पोलीस निरीक्षक (गुन्हे) युवराज नांद्रे
(PI Yuvraj Nandre) , सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील (API Narendra Patil, पोलीस उपनिरीक्षक रुपेश चाळके
(PSI Rupesh Chalke), पोलीस अंमलदार सुधीर माने, श्रीकांत वाघवले, बाबुलाल तांदळे, किशोर दुशिंग, मारुती केंद्रे,
इरफान मोमीन, बाबा दांगडे, प्रदीप खरात, श्रीधर शिर्के, विशाल शिर्के, संदिप दुर्गे व बाळासाहेब भांगले यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Prakash Ambedkar On Lok Sabha Election 2024 | प्रकाश आंबेडकरांकडून नव्या समीकरणाचे संकेत, म्हणाले ”महाराष्ट्रात नव्या राजकारणाची सुरूवात…”

Pune Sadashiv Peth Crime | सदाशिव पेठेतील आणखी एका मंदिरात चोरी, दानपेटीतून रोकड लंपास