Pune Corona Lockdown | पुणेकरांना Lockdown मधून सूट नाही, निर्बंधाची स्थिती सोमवारपासून जैसे थेच राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाची (Corona) दुसरी लाट ओसरत असल्याने टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील करण्यात येत आहे. पुणे शहरातही कोरोना (Pune Corona Lockdown) बाधितांच्या संख्येत घसरण झाली आहे. त्यामुळे पुण्यात लागू असलेले निर्बंध (Pune Lockdown) आणखी शिथिल होतील, अशी पुणेकरांना अपेक्षा होती. मात्र पुन्हा एकदा डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका पाहता पुण्यात तूर्तास जे निर्बंध लागू आहेत, ते पुढे तसेच लागू राहणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी दिली आहे. तसेच शाळा- कॉलेज 15 जुलैपर्यंत बंद असतील, असेही वळसे- पाटील यांनी स्पष्ट केले आहे. pune corona lockdown unlock from monday 28th june hotel parcel essential service continue

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

पुण्यातील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी बैठकीनंतर प्रसारमाध्यामांशी बोलताना वळसे- पाटील म्हणाले की, निर्बंध शिथिल केल्यानंतर पॉझिटिव्हिटी दर वाढताना दिसत आहे. त्यामुळे तो आणखी वाढेल असे तज्ज्ञाचे मत आहे. त्यामुळे तूर्तास जे निर्बंध लागू आहेत, ते जैसे थेच राहणार आहेत. पुणे जिल्ह्यात लसीकरण (Vaccination) वेगाने सुरु आहे. परदेशात तिसरी लाट वेगाने वाढत आहे. त्यामुळे आपल्याला काळजी घ्यावी लागेल. लोक पर्यटनासाठी बाहेर पडताहेत हे थांबले पाहिजे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका जास्त असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

पुण्यात सोमवारपासून काय सुरु, जाणून घ्या

1) पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर हे शनिवार अन् रविवार पूर्णतः बंद राहतील.

2) शनिवारी रविवारी केवळ अत्यावश्यक सुविधा आणि हॉटेल्सची पार्सल सेवा सुरू राहणार आहे. रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट हे शनिवार अन् रविवारी फक्त पार्सल सेवा, घरपोच सेवेसाठी रात्री 11 पर्यंत सुरू राहणार आहेत.

3) विनाकारण जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या पुणेकरांना 15 दिवसांसाठी क्वॉरंटाईन केले जाईल.

4) 5 जून 2021 रोजीच्या आदेशातील अत्यावश्यक सेवेतील नमूद दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहतील.

5) कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालांची विक्री करणारे दुकाने, गाळे हे आठवड्यातील सातही दिवस सुरू राहणार आहेत.

6) नाट्यगृहे, चित्रपटगृह बंदच राहणार

Web Title :- pune corona lockdown unlock from monday 28th june hotel parcel essential service continue

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Paranjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक

पुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर ED चा ‘छापा’; 100 कोटीच्या वसुली प्रकरणाचा सुरुय तपास

2800 रुपयांचे जेवण ऑर्डर केले आणि 12 लाख रु. टिप दिली, वेटरने सांगितली ‘त्या’ मिस्ट्री मॅनची पूर्ण कथा

आदर्श ! जमशेदजी टाटा 100 वर्षात जगातील सर्वात मोठे ‘दानशूर’