Pune corona | पुणे जिल्ह्यात 107 गावात ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, परिस्थिती अद्यापही बिकटच

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुणे जिल्ह्यात कोरोनाची (Pune corona) दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी, पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कायम आहे. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) ओसरत आहे. पण या दोन शहरांना लागून असलेल्या ग्रामीण भागात (rural area) अद्याप परिस्थिती बिकटच आहे. पुणे जिल्ह्यातील 107 गावांमध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात नवीन रुग्णांची संख्या वेगाने वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या गावांची चिंता वाढली आहे.

प्रशासनाने बोलावली तातडीची बैठक
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या ज्या गावात वाढत आहे त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहेत. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आणि अधिक कडक निर्बंध करण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी जिल्हा परिषदेने (Zilla Parishad) या गावातील गाव कारभारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक आज (शुक्रवार) बोलावली आहे. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणार आहे.

 

सर्वाधिक गावे जुन्नर तालुक्यात

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 107 गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात सर्वाधिक 21 गावे असून सर्वात कमी केवळ दोन गावे वेल्हा तालुक्यातील आहेत. महत्त्वाचे म्हणजे कोरोनाच्या पहिल्या लाटेत वेल्हा तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता. पुणे आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. परंतु याला जिल्ह्याचा ग्रामीण भाग अपवाद ठरु लागला आहे. ग्रामीण भागात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

अभ्यासातून ही बाब उघड
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (CEO Ayush Prasad) यांनी सांगितले की,
ग्रामीण भागातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसून आल्यानंतर,
जिल्हा परिषदेने एका सामाजिक संस्थेच्या मदतीने मे आणि जून महिन्यात गावनिहाय अभ्यास केला होता.
सामाजिक संस्थेने केलेल्या अभ्यासातून ग्रामीण भागात नवीन रुग्णांची संख्या वाढत असल्याची बाब उघडकीस आली.

रुग्ण वाढणाऱ्या गावांची संख्या
आंबेगाव -8, वेल्हे -02, जुन्नर -21, दौंड -06, बारामती-11, खेड-13, मावळ-11, मुळशी-07, पुरंदर-11 आणि हवेली -12

Web Titel :- pune corona | number of new corona patients is increasing in 107 villages of pune district

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune News | ‘आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं, आम्हला काही नको’, तुम्ही एकत्र येऊन मार्ग काढा, संजय राऊतांचा पुण्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना सल्ला

Pune News | पोलीसनामाच्या बातमीचा दणका ! अखेर शिरुरचे नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव यांच्यावर निलंबनाची कारवाई

EPFO | बदलणार PF खात्याशी संबंधीत नियम, EPF चे पैसे पाहिजेत तर आजच पूर्ण करा ‘हे’ काम