Pune Corona | पुणे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट राज्यात सर्वाधिक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Corona | कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून तिसऱ्या लाटेचे संकेत देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहेत. काही दिवसापासून बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. राज्यातील पुणे जिल्ह्याचा आठवड्याचा कोरोनाबाधित दर इतर जिल्ह्याच्या तुलनेत सर्वाधिक आहे. सध्या जिल्ह्याचा कोरोनाबाधित दर ६.३३ टक्के इतका आहे. तर राज्याचा दर केवळ २.६७ टक्के एवढा आहे.तज्ज्ञांच्या मते, पुणे शहर व जिल्ह्यात कोरोना संसर्ग (Pune Corona) टळला नसून गणेशोत्सव, नवरात्र उत्सवात नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

आरोग्य विभागाने ३१ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या आठवड्यातील राज्यातील कोरोना रुग्णांच्या आढावा संदर्भातील साप्ताहिक अहवाल प्रसिद्ध केला आहे.
त्यामध्ये राज्यातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी २५.८९ टक्के रुग्ण पुणे जिल्ह्यातील असल्याची नोंद करण्यात आली आहे.
या आठवड्यात राज्यात ४७ हजार ६९५ सक्रिय रुग्ण होते.
त्या पैकी १२ हजार ४०९ रुग्ण एकट्या पुणे जिल्ह्यातील होती.
हीच रुग्णसंख्या गेल्या तीन दिवसात दोन हजार ४७०ने कमी झाली आहे.
सध्या पुण्यात ९ हजार ९३९ सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, सर्वाधिक कोरोनाबाधित दरांमध्ये सांगली दुसऱ्या तर, नगर तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांचा बाधित दर अनुक्रमे ५.५९ टक्के आणि ५.३५ टक्के इतका आहे.

यासंदर्भात बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार म्हणाले, कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही.
सध्या सण उत्सवाचे दिवस असून नागरिकांनी स्वत:हून काळजी घेणे आवश्यक आहे.
सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता नागरिकांनी सॅनिटायझर, मास्कचा नियमित वापर, सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे.
महत्त्वाचे म्हणजे, लक्षणे दिसताच त्वरित तपासणी करून घ्यावी असे आव्हानही त्यांनी केले.

 

Web Title : Pune Corona | pune district highest corona rate in maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Crime News | पतीच्या निधनानंतर वृद्ध पत्नीनेही केली 7 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

Congress | राजीव सातवांच्या पत्नी प्रज्ञा यांना राज्यसभा की विधानसभेवर संधी? काँग्रेसच्या निर्णयाकडे लक्ष

India vs England 5th test | …म्हणून भारत विरुद्ध इंग्लंड 5 वी कसोटी रद्द; इंग्लंड विजयी घोषित