Pune Corona Restrictions | पुणे व्यापारी महासंघाचा इशारा, अजित पवारांनी निर्णय घ्यावा अन्यथा सोमवारपासून…

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने लागू केलेले निर्बंध शिथिल (Pune Corona Restrictions) करावेत अशी मागणी होत आहे. राज्यातील काही जिल्ह्यामध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र पुण्यात निर्बंध शिथिल (Pune Corona Restrictions) करण्यात आले नाहीत. यामुळे पुण्यातील व्यापारी आक्रमक झाले आहेत. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि जिल्हा प्रशासनाने (District Administration) शहरातील सर्व दुकानांच्या वेळा वाढवण्याचा निर्णय रविवारी होणाऱ्या आढावा बैठकीत जाहीर करावा. अन्यथा सोमवारपासून पुन्हा शहरातील दुकाने रात्री 8 पर्यंत आम्ही सुरु ठेवणार आहोत, असा स्पष्ट इशारा पुणे व्यापारी महासंघाने (merchant federation) दिला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील दुकाने दुपारी चार पर्यंत उघडी ठेवण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. तर शनिवार-रविवार दुकाने बंद ठेवली जात आहेत.
या विरोधात लक्ष्मी रस्त्यावरील (Lakshmi Road) काही व्यापाऱ्यांनी निर्बंध झुगारुन सगल तिसऱ्या दिवशी दुकाने उघडी ठेवली आहेत.
नियमांचे उल्लंघन करुन दुकाने सुरु ठेवलेल्या दुकानांचे पुणे पोलिसांनी (Pune Police) शुक्रवारी फोटो काढले. मात्र व्यापारी आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

 

 

पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका (Fatehchand Ranka) यांनी सांगितले की, सद्यस्थितीत आम्ही सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दुकाने सुरु ठेवली आहेत.
व्यापाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. कर्मचाऱ्यांचे पगार कसे करायचे, असे प्रश्न उभे राहिले आहेत.
त्यामुळे शासनाने व्यापाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन वेळ वाढवून द्यावा, असे रांका यांनी सांगितले.

रांका पुढे म्हणाले, रविवारी (दि.8) पुण्यात कोरोना आढावा बैठक (Corona review meeting) आहे.
या बैठकीमध्ये शहरातील सर्व व्यापाऱ्यांच्या मागणी संदर्भात योग्य निर्णय जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे. दुकानांची वेळ वाढवून मिळाली नाही, तर सर्व व्यापारी दुकाने सुरु ठेवणार आहेत.
त्यामुळे प्रशासनाने याचा विचार करावा, असा इशारा त्यांनी दिला आहे.

 

Web Title : Pune Corona Restrictions | ajit pawar should take decision otherwise he will start shops monday pune merchant federation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corporation | शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पालिका प्रशासन लागले कामाला

PMRDA | पीएमआरडीएचा विकास आराखडा जाहीर ! धरणे, कालवे परिसरात 20 टक्के बांधकामास परवानगी

MP Sanjay Raut | ‘तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आला, आम्ही काही बोललो का? राऊतांचा पलटवार