Pune News : पुणे शहरात दिवसभरात 192 ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण, 234 जणांना डिस्चार्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात शनिवारी (दि.16) 192 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 234 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (शनिवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 3 हजार 049 स्वॅब तपासणी करण्यात आली.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 201 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज दिवसभरात 5 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 1 रुग्ण शहराबाहेरील आहे. आतापर्यंत 4 हजार 700 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या  2 हजार 573 इतकी आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 82 हजार 901 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 लाख 75 हजार 628 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

अवघ्या जगाचे लक्ष लागून असलेल्या व जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असलेल्या सिरम इन्स्टिट्यूट निर्मित ‘कोविशिल्ड’ या कोरोना प्रतिबंधक लसचे देशात आजपासून (शनिवार) लसीकरण सुरु झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ झाला. तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत लसीकरणाला सुरुवात झाली आहे. लस सुरक्षित असल्याचा महत्वपूर्ण संदेश देत सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक अदर पूनावाला यांनी आज स्वत: ‘कोविशील्ड’ लस टोचून घेतली आहे.