Pune News : पुणे शहरात दिवसभरात 273 ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण, 345 जणांना डिस्चार्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात रविवारी (दि.17) 273 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 345 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (रविवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 3 हजार 205 स्वॅब तपासणी करण्यात आली.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 206 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज दिवसभरात 9 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 6 रुग्ण शहराबाहेरील आहे. आतापर्यंत 4 हजार 703 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 2 हजार 498 इतकी आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 83 हजार 174 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 लाख 75 हजार 973 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ही लसीकरणाची मोहीम केंद्रीय यंत्रणेकडून जिल्हा यंत्रणेमार्फत राबवली जात आहे. काही सायबर हल्लेखोर नागरिकांना फोन करुन या लसीची नोंदणी करण्यासाठी मोबाइलवर आलेला ओटीपी, आधार क्रमांक, पिन कोड व इतर वैयक्तीक माहिती विचारत आहेत. अशा प्रकारच्या भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नये, तसेच आपली कोणतीही वैयक्तीक माहिती सामायिक करु नये, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.