Pune Corporation Amenity Space | राष्ट्रवादीच्या माघारी मुळे सत्ताधाऱ्यांनी अ‍ॅमिनिटी स्पेस भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव ‘गुंडाळला’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  महापालिकेच्या अमेनिटी स्पेस (Pune Corporation Amenity Space) दीर्घ कराराने भाड्याने देण्याच्या प्रस्तावावरून रात्रभरात नाट्यमय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (NCP) घातलेल्या अटी भाजपने (BJP) न स्वीकारल्याने राष्ट्रवादीने विरोधाची भुमिका कायम ठेवल्याने भाजपची गोची झाली. त्यामुळे बहुमत असताना व व्हीप काढून सर्व सदस्य उपस्थित असतानाही सभा तहकूब करावी लागली. अशातच आगामी निवडणुकांचे बिगुल वाजल्याने वादग्रस्त ठरलेला (Pune Corporation Amenity Space) हा प्रस्ताव तूर्तास तरी गुंडाळला गेला ! अशी चर्चा प्रशासन व राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

वित्तीय तूट भरून काढणे आणि अतिक्रमण रोखणे यासाठी पुणे महापालिकेच्या (Pune Corporation) आरक्षित 85 आणि अनारक्षित 185 अमेनिटी स्पेस 30 वर्ष कराराने भाडे तत्वावर देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला होता.
प्रामुख्याने सत्ताधारी भाजपा हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेतही मंजूर व्हावा यासाठी आग्रही होते.
बहुमत असल्याने स्थायी समितीमध्ये (standing committee) मंजूर झालेल्या या प्रस्तावाला विरोधी पक्षांशह विविध संघटनांनीही विरोध केला होता.

 

या पार्श्वभूमीवर विरोधाची धार कमी व्हावी व हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी सहकार्य करावे यासाठी सभागृह नेते गणेश बिडकर (bjp group leader ganesh bidkar) यांनी प्रमुख विरोधीपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
या चर्चेला राष्ट्रवादी काँग्रेस च्या काही पदाधिकाऱ्यांनी काही अटींवर प्रस्तावाला समर्थन देण्याची तयारी दर्शवली.
यासंदर्भात काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण (MP Adv Vandana Chavan) आणि प्रवक्ते अंकुश काकडे (NCP Spokesperson Ankush Kakade) यांनी पत्रकार परिषद घेऊन भुमिका विषद केली.
यामध्ये 185 अनारक्षित जागांपैकी 33 टक्के जागांवर सामाजिक सहभागातून अर्बन फॉरेस्ट अंतर्गत वृक्षांची लागवड करायची.
तसेच विकास आराखडा व अ‍ॅमिनिटी स्पेस यांची सांगड घालून सार्वजनिक सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घ्यावा.
तसेच या अमेनिटी स्पेसवर उभ्या राहणाऱ्या सुविधा सर्वसामान्य नागरिकांना सहज सुलभ उपलब्ध व्हाव्यात या उपसूचना मान्य करण्याची तयारी बिडकर यांनी दर्शवल्यास पाठिंबा देण्यास तयार आहोत
असेही चव्हाण आणि काकडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. मात्र रात्रीत चक्र उलट फिरले.

राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (ncp city president prashant jagtap) यांनी पत्रकाराना माहिती देताना सांगितले, की राष्ट्रवादी काँग्रेस ने काही अटी ठेवल्या होत्या.
परंतु रात्री साडेअकरा वाजता बिडकर यांनी उपसूचना तयार करून पाठवल्या.
त्यामध्ये आम्ही मांडलेल्या सूचनांचा समावेश न्हवता.
त्यामुळे आम्ही प्रस्तावाला विरोध करण्याची पहिली भुमिका कायम ठेवली. रात्रीच सर्व नगरसेवकांना याबाबत फोन करून कल्पना देण्यात आली.
तर काँग्रेस चे गटनेते आबा बागुल (congress group leader aba bagul) आणि शिवसेनेचे
गटनेते पृथ्वीराज सुतार (Shiv Sena group leader Prithviraj Sutar) यांनी देखील अमेनिटी स्पेस भाडेतत्ववार देण्यास विरोध असल्याची भुमिका कायम ठेवली.

 

दरम्यान आज झालेल्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी होता.
हा विषय मंजूर करण्यासाठी भाजपने सर्व नगरसेवकांना व्हीप बजावला होता.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस ने आज सकाळी अटी मान्य न केल्याने प्रस्तावाला विरोध असल्याची अधिकृत भूमिका जाहीर केली. यानंतरही बिडकर यांनी त्यांचे प्रयत्न सुरू ठेवले होते.
यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत पुन्हा एकदा चर्चा केली.
प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अमेनिटी स्पेस भाडेतत्वावर देण्यामागील सकारत्मक व नकारात्मक दोन्ही बाजू निदर्शनास आणून दिल्या.
त्यामुळे सभा सुरू झाल्यानंतर सभागृह नेते गणेश बिडकर यांनी आजची सभा 8 सप्टेंबर पर्यंत
तहकूब करण्याची तहकुबी मांडली व ती मंजूर करत महापौर मुरलीधर मोहोळ
(mayor murlidhar mohol) यांनी सभा तहकूब केली.

विशेष असे की, काल राष्ट्रवादी काँग्रेस ने काही अटी व शर्तींवर प्रस्तावाला पाठिंबा देण्याचे जाहीर
केल्यानंतर काही वेळेतच आगामी महापालिका निवडणूकीसाठी एक सदस्यीय वॉर्ड रचनेचा प्रारूप
आराखडा तयार करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश आले.
त्यामुळे हा वादग्रस्त प्रस्ताव अंगलट येण्याच्या शक्यतेने सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही हा प्रस्ताव तूर्तास का होईना गुंडाळला अशी चर्चा राजकीय व प्रशासकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

 

Web Title : Pune Corporation Amenity Space | Due to the withdrawal of NCP, the proposal to lease amenity space was ‘rolled out’ by the ruling party!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ramdas Athavale | रामदास आठवलेंसह रिपब्लिकन पक्षाचे नेते नारायण राणेंच्या भेटीला, दिला हा महत्वाचा सल्ला

Sangli Crime | कोडोली येथील माय-लेकीची वारणा नदीत उडी टाकून आत्महत्या

Pune Corporation Amenity Space | अ‍ॅमेनिटी स्पेसवरून ‘आप’चे महापालिकेत आंदोलन, भाजपा-राष्ट्रवादीविरोधात जोरदार घोषणाबाजी (VIDEO)