Pune Corporation | शेवटच्या टप्प्यात स्थायी समितीची कोट्यवधींची उड्डाणे ! 400 कोटींच्या निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

खराडीतील पीपीपी तत्वावरील रस्ते, नदीवरील पुल आणि नदी काठ सुधार योजनेचा समावेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | खराडी व मुंढवा येथील पीपीपी तत्वावरील आठ रस्ते (Eight Roads On PPP Basis At Kharadi And Mundhwa) तसेच मुळा – मुठा नदीवरील उड्डाणपुलाच्या विकासासाठीच्या सुमारे १४० कोटी रुपयांच्या निविदा (Tender) तसेच मुळा – मुठा नदी काठ सुधार योजनेची (Mula Mutha Riverfront Development) सुमारे २६० कोटी रुपयांची निविदा येत्या बुधवारी मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे येणार आहे. यापैकी रस्ते आणि उड्डाणपुल हे पीपीपी तत्वावर क्रेडीट नोटच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहेत. तर नदी काठ सुधार योजनेच्या संगमवाडी ते बंडगार्डन पुला (Sangamwadi To Bundgarden Bridge) दरम्यानचा पहिला टप्पा महापालिकेच्या (Pune Corporation) खर्चातून करण्यात येणार आहे.

 

खराडी स. नं. ३,४,७ येथील १८ मी. डी. पी. रस्ता, रॅडीसन हॉटेल (Radisson Hotel Pune) ते खराडी स. नं. ६० मधील ३६ मी. रस्ता, खराडी बायपास (Kharadi Bypass)
परिसरातील १८ मी, ३० मी. आणि ३६ मी. रस्ता, खराडी स. नं. ५९, ६० येथील १८ व २४ मी. डी. पी. रस्ता राजाराम नगर येथील १८ व ३६ मी. डी. पी. रस्ता, खराडी स. नं. ४, ४०, ४१ येथील १८ मी. डी. पी. रस्ता ते खराडी स. नं. ४० येथील १८ मी. ते २४ मी रस्ता, खराडी स. नं. ३९, ४१, ४२, ४३ येथील २४ मी रस्ता,
तसेच या रस्त्याला जोडणारा कोलते पाटील बिल्डिंग ते खराडी दर्गा येथील २४ मी. डी. पी. रस्ता,
खराडी येथील स. नं. ३८, ३९ येथील २४ मी. डी.पी. रस्ता ते खराडी बायपास येथील कोलते बिल्डींग मागील डी. पी. रस्ता, खराडी स. नं. ५६, ५७ येथील १८ मी. डी.पी. रस्ता ते खराडी स. नं. ५७ येथील २४ मी. डी.पी. रस्ता नगररोड पर्यंत विकसित करणे,

खराडी स. नं. ६७, ६८, ६९ येथील ३० मी. डी. पी. रस्ता ते खराडी हुलाजीनगर, पाचपीर चौक येथील ३० मी. चा वाघोली नदी जवळील रस्ता विकसित करण्याची निविदा उघडण्यात आली आहे.
तसेच मुंढवा स. नं. ९ ते १४ येथून मुळा – मुठा नदी ओलांडून खराडी येेथील स. नं. १६/१४ अ येथे जाण्यासाठी उड्डाणपुल उभारण्याची निविदा उघडण्यात आली आहे. (Pune Corporation)

रस्त्यांच्या कामांच्या अनुक्रमे दोन निविदांमध्ये प्रत्येकी चार कंपन्या सहभागी झाल्या होत्या.
त्यामध्ये कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (Krishnai Infrastructure Pvt Ltd)
या कंपनीची एक टक्का कमी दराने आलेली १०८ कोटी १६ लाख रुपयांची निविदा सर्वात कमी दराची आहे.
तर यापैकी काही रस्त्यांची अन्य एक निविदेमध्ये व्हि. एम. मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (V. M. Matere Infrastructures Pvt Ltd) या कंपनीची पॉईंट ५० अधिक दराची ८ कोटी ४४ लाख रुपये किंमतीची निविदा सर्वात लोवेस्ट ठरली आहे.
तर नदीवरील पुलाच्या कामासाठीही चार निविदा आल्या होत्या.
त्यामधील निखिल कन्स्ट्रक्शन (Nikhil Constraction Pune)
कंपनीची १.९३ टक्के अधिक दराने आलेली २३ कोटी ४७ लाख रुपये दराची निविदा सर्वात कमी दराची ठरली आहे.
या पुलासाठी अन्य तीन कंपन्यांनी भरलेल्या निविदा २२ ते ३५ टक्के अधिकच्या आहेत.

मुळा- मुठा नदी काठ सुधार योजनेची निविदा मान्यतेसाठी येणार
मुळा – मुठा नदी काठ सुधार योजनेतील संगमवाडी ते बंडगार्डन या पहिल्या टप्प्यासाठीच्या कामासाठी ३०५ कोटी रुपयांचे एस्टीमेट करून निविदा काढण्यात आली.
या कामासाठी पाच कंपन्यांनी निविदा भरल्या असून यासाठी पाच कंपन्यांपैकी बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीची
(BG Shirke Construction Technology Pvt Ltd)
१३. १४ टक्के कमी दराने आलेली अर्थात सुमारे २६० कोटी रुपयांची निविदा सर्वात कमी दराची ठरली आहे.
जीएसटी, विमा, रॉयल्टीचा विचार करता या योजनेचा खर्च ३२० कोटी रुपयांपर्यंत वाढणार आहे.

 

Web Title :- Pune Corporation | Billions of Standing Committee flights in the last phase 400 crore before the Standing Committee for tender approval

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा