Pune Corona Update | पुणेकरांना मोठा दिलासा ! गेल्या 24 तासात नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत कमालीची घट, जाणून घ्या आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिका हद्दीमध्ये कोरोना बाधित (Pune Corona Update) रुग्णांची संख्या कमी होत आहे. रुग्ण कमी होत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) 228 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 920 रुग्ण बरे झाले आहेत.

 

पुणे शहरात आज दिवसभरात विविध तपासणी केंद्रावर 3917 लोकांची तपासणी करण्यात आली यामध्ये 228 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पुणे शहरात आजपर्यंत 44 लाख 38 हजार 451 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहे. यामध्ये 6 लाख 57 हजार 183 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Update) आढळून आले आहे. त्यापैकी 6 लाख 42 हजार 968 इतके रुग्ण बरे झाले आहेत.

 

पुण्यात गेल्या 24 तासात 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे रुग्ण हद्दीबाहेरील असून आज शहरातील एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.
आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 331 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 4 हजार 884 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 202 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Invasive ventilator) वर 29 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Non-Invasive ventilator) 19 रुग्ण आहेत.
एकूण ॲक्टिव्ह रुग्णांपैकी 12.00 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

 

Web Title :- Pune Corona Update | Great relief to the people of Pune The number of new corona infections has dropped dramatically in the last 24 hours according to statistics

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा