Pune Corporation | मंडई विद्यापीठ कट्टावर काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांसोबत मनसोक्त चर्चा; माजी मंत्री रमेश बागवे म्हणाले – ‘काँग्रेस स्वबळावर पुणे महानगरपालिका लढायला सक्षम’

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  खोटी आश्वासने आणि जनतेला आशेवर ठेवून सत्ता टिकत नसते त्यासाठी योग्य कामे देखील करावी लागतात. केंद्रात असो किंवा पुणे महानगरपालिकेत (pune corporation) असो भारतीय जनता पक्षाने (BJP) फक्त जाहिरातबाजी करून जनतेला अंधारात ठेवण्याच काम केल आहे. पुण्यातील नागरीक हा सुज्ञ आणि समजदार असून त्यांना योग्य विचारांची पराख आहे. येत्या पुणे महानगरपालिकेच्या (pune corporation) निवडणुकीत याचे प्रमाण देखील सगळ्यांना पहायला मिळेल. प्रदेश अध्यक्ष म्हणून राज्याला नानासाहेब पटोले (Nana Patole) यांचे खंबीर नेतृत्व लाभले आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवायला सक्षम आहे. असे मत पुणे शहरातील काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी मंडई विद्यापीठ कट्टावर (Mandai Vidyapeeth katta-kalpana) व्यक्त केले.

Pune Corporation | Heartfelt discussions with Congress office bearers on Mandai Vidyapeeth katta-kalpana; Former Minister Ramesh Bagwe says - 'Congress is able to fight Pune Municipal Corporation on its own'

आज मंडई विद्यापीठ कट्टावर काँग्रेस पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे (Congress Pune City President Ramesh Bagwe), गटनेते आबा बागुल (Aba Bagul), प्रदेश प्रवक्ता गोपाळ तिवारी (Gopal Tiwari), माजी नगरसेवक अभय छाजेड (abhay chhajed), माजी नगरसेवक संजय बालगुडे (Sanjay Balgude) आदी पदाधिकारी आमंत्रित करण्यात आले होते. शहराच्या विविध प्रश्नावर, राजकीयदृष्ट्या शहरातील कामे व विकास योजना कशा पद्धतीने राबविण्यात याव्यात या मुद्यावर विषेश लक्ष केंद्रित करून आज कट्टावर चर्चा झाली. मंडई विद्यापीठ कट्टा, पुणेचे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे (Mandai Vidyapeeth katta-kalpana, Pune President Balasaheb Malusare) यांच्या वतीने सर्व आमंत्रित मान्यवराचा सन्मान सत्कार देखील करण्यात आला.

Pune Corporation | Heartfelt discussions with Congress office bearers on Mandai Vidyapeeth katta-kalpana; Former Minister Ramesh Bagwe says - 'Congress is able to fight Pune Municipal Corporation on its own'

बाळासाहेब मालुसरे (Balasaheb Malusare) म्हणाले, गेल्या सात वर्षांपासून दर शनिवारी मंडई विद्यापीठ कट्टावर विविध क्षेत्रातील अभ्यासक मान्यवर येतात.
विवीध विषयावर चर्चा करतात व त्यातून येणारे समविचार समाजासाठी कशे उपयुक्त ठरेल यावर मिमांसा केली जाते.
त्याच क्रमांत राजकारणाच्या दृष्टीने पुणे शहर यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज काँग्रेस पक्षाचे शहरातील प्रमुख पदाधिकारी आमंत्रित केले होते.
येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस कशी भुमिका घेऊन काम करेल यावर आज चर्चा झाली. येत्या काळात एक एक करून सर्व प्रमुख पक्षाना आम्ही कट्टावर आमंत्रित करणार आहोत असेही ते म्हणाले.

Web Title : Pune Corporation | Heartfelt discussions with Congress office bearers on Mandai Vidyapeeth katta-kalpana; Former Minister Ramesh Bagwe says – ‘Congress is able to fight Pune Municipal Corporation on its own’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

SBI Offering CA Service | SBI ची नवीन सुविधा, केवळ 199 रुपयात घ्या CA ची सर्व्हिस!
जाणून घ्या सर्वकाही

Satara Landslide | सातार्‍यात दरड कोसळली; NDRF ने 6 मृतदेह बाहेर काढले, 8 जण अजूनही बेपत्ता

Paytm चे आणखी एक यश, ऑनलाइन ट्रांजक्शनसाठी बनवले 15.5 कोटी UPI हँडल्स