Pune Corporation | पुण्याच्या नाना पेठेतील डिप्रेस्ड क्लासेस मिशनला 90 वर्षे कराराने जागा देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर

प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठविणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Corporation | नाना पेठ येथे दी डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया (Depressed Classes Mission Society of India) या संस्थेमार्फत चालविण्यात येणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य महाविद्यालय, महात्मा जोतिराव फुले मुलींचे हायस्कूल, महात्मा जोतिराव फुले मुलांचे हायस्कूलच्या जागेचा करार महापालिकेने वाढवून देण्याचा प्रस्ताव आज स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरअध्यक्ष व नगरसेवक प्रशांत जगताप (ncp city president prashant jagtap) आणि विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ (Pune Corporation Leader of Opposition Deepali Dhumal) यांनी हा प्रस्ताव दिला होता.

महापालिकेने 90 वर्षांपुर्वी नाना पेठेतील जागा डिस्प्रेड क्लास मिशनला नाममात्र भाडेकराराने दिली होती. डिस्प्रेड क्लास मिशनच्या माध्यमातून याठिकाणी महाविद्यालय, मुली व मुलांचे हायस्कूल चालविण्यात येते.
या शाळा आणि महाविद्यालयामध्ये तळागाळातील तसेच बहुजन वर्गातील लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले असून अनेक पिढ्या साक्षर झाल्या आहेत.

परंतु, फेब्रुवारी महिन्यात करार संपला असून, महापालिकेकडून संस्थेला करार
वाढवून देण्याबाबत कोणतीही हालचाल केली जात नाही. त्यामुळे, संस्था, विद्यार्थी-पालकांपुढे चिंता आहे.
त्यामुळे, या संस्थेस देण्यात आलेल्या जागेचा करार हा पूर्वीच्याच दराने आणि
आणखी ३० वर्षांसाठी वाढवून देण्यात यावा, असे आवाहन जगताप आणि धुमाळ यांनी केले होते.
या शिक्षण संस्थांना राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रत्यक्ष सहवास लाभला आहे.
या संस्थेमार्फत चालविण्यात येणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य महाविद्यालय,
महात्मा जोतिराव फुले मुलींचे हायस्कूल, महात्मा जोतिराव फुले मुलांचे हायस्कूलमधून
बहुजन समाजातील बहुसंख्या विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बहुजन समाजातील अनेक
पिढ्या घडविण्याचे काम या संस्थेने केले आहे.
अशा परिस्थितीत महानगरपालिकेने गेल्या जवळपास 90 वर्षांपासून कार्यरत असलेल्या
या संस्थेचा इतिहास आणि संस्थेमार्फत सुरू असलेले कोणतेही कार्य लक्षात घेतलेले दिसत नाही.
महापालिकेच्या सत्ताधार्‍यांनी या जागेकडे केवळ महापालिकेची जागा म्हणून न पाहता बहुजनांची पिढी घडविणारी संस्था म्हणून पाहावे, म्हणजे त्याचे महत्त्व लक्षात येईल, अशी विनंतीही केली होती.

 

दरम्यान, उपमहापौर सुनिता वाडेकर (Deputy Mayor Sunita Wadekar) आणि
माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (former Deputy Mayor Dr. Siddharth Dhende) यांनी देखिल या संस्थेला पुर्वीच्याच भाडेदराने शाळेची जागा देण्यात यावी, असा प्रस्ताव स्थायी समितीला दिला होता.
आज स्थायी समितीच्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला संस्थेला 90 वर्षे भाडेकराराने जागा देण्यात
यावी आणि प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात यावी, अशी उपसूचना देण्यात आली.
या उपसूचनेसह प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने
(standing committee chairman hemant rasane) यांनी दिली.
उपमहापौर सुनिता वाडेकर यांनी गेल्या काही महिन्यांपासून करत असलेल्या पाठपुराव्याला आज यश आल्याचे सांगतानाच स्थायी समितीचे आभारही मानले.

 

Web Title : Pune Corporation | Standing Committee approves proposal to give space to Depressed Classes Mission at Nana Pethe, Pune under 90 years contract

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corporation | मुंबईच्या नेत्याचे ‘लाड’ पुरविण्यात यश, पुण्याचा ‘पैलवान’ गारद ! सुरक्षा रक्षक पुरविण्याच्या निविदेवरून दोन पदाधिकार्‍यांमध्ये ‘द्वंद्व’

Fake Milk Test | तुम्ही भेसळयुक्त दूध, तूप किंवा पनीर खरेदी करत आहात का?, एक मिनिटात ‘या’ पध्दतीनं तपासा, जाणून घ्या

Pune Corporation | पहिल्या 5 महिन्यात नवीन 22 हजार मिळकतींवर कर आकारणी; बांधकाम विभागाने मिळवले 600 कोटी