Pune Corporation | स्थायी समितीचे ‘वराती मागुन घोडे’ ! प्रशासनाची वर्षभरापासून ‘कार्यवाही’ स्थायी समितीचा निर्णय आता

पुणे न्यूजपोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Corporation | उत्पन्न वाढीच्या दृष्टीने महापालिकेच्या (Pune Corporation) मिळकती भाड्याने देण्याचे प्रस्ताव दीर्घकाळ प्रलंबित ठेवणार्‍या नगरसेवकांपेक्षा उत्पन्न वाढीसाठी महापालिका प्रशासन एक पाऊल पुढेच असल्याचे स्थायी समितीच्या आजच्या एका निर्णयामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने महापालिकेच्या जागांची अद्ययावत माहिती गोळा करणे, भाडेकरूंकडून करार मागविणे, थकबाकी वसुल करण्याची मोहीम वर्षभरापुर्वीच हाती घेत उत्पन्नामध्ये निर्णायक भर घातली आहे. मात्र, आज स्थायी समितीने (standing committee) याच कामासाठीचा प्रस्ताव मंजुर करत ‘वराती मागून घोडे’ या म्हणीचा प्रत्यय दिला.

स्वत:च्या मालकिच्या जागा तसेच भाडेतत्वावर देण्यात आलेल्या जागा व मिळकतींचे रेकॉर्ड तयार करण्याचे काम महापालिकेच्या (Pune Corporation) मालमत्ता विभागाने मागील वर्षभरापासूनच सुरू केले आहे. या विभागाने मागील वर्षीपासून भाडेतत्वावर दिलेल्या मिळकती व जागांचे करार मिळावेत तसेच थकबाकी वसुलीसाठी नोटीसेसही बजावल्या आहेत.
यामुळे 2020-21 या वर्षात महापालिकेला 50 कोटी रुपये उत्पन्न मिळाले असून यावर्षी पहिल्या तिमाहीमध्ये 20 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
2020-21 अगोदरच्या वर्षामध्ये महापालिकेला जेमतेम 20 कोटी रुपये वार्षिक उत्पन्न मिळत होते.

परंतू मालमत्ता विभागाने कोरोना काळातही महापालिकेने भाडेकराने दिलेल्या 1600 सदनिका तसेच 300 व्यावसायीक वापराच्या मिळकतींचा रितसर ‘हिशेब’च घ्यायला सुरूवात केली आहे.
भाडेकरूंचे करार शोधून न सापडल्यास ते भाडेकरूंकडूनच मागविणे, करारानुसार अंमलबजावणी होते की नाही याची माहिती घेणे, करार संपला असल्यास मिळकती ताब्यात घेणे तसेच थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीमच उघडली. आतापर्यंत 1200 भाडेकरूंना नोटीसही बजावल्या आहेत.
त्यामुळे मागीलवर्षीपासून या विभागाचे उत्पन्न जवळपास अडीचपटीने वाढले आहे.

करार संपल्यानंतरही भाडेकरूच्या कब्जात असलेल्या मिळकतींवर बोजाही चढविण्यात आला आहे. अगदी सावरकर भवन येथील तळमजल्यावरील थकबाकीदारांकडून मिळकतीही ताब्यात घेतल्या आहेत. 30 वर्षांच्या दीर्घ कराराने दिलेल्या चार ते पाच जागा करार संपल्याने महापालिकेच्या ताब्यातही आल्या आहेत.
तसेच 90 वर्षे कराराने डिस्प्रेस्ड क्लास मिशन या संस्थेला शैक्षणिक उद्देशाने दिलेल्या जागेचा करार संपल्यानंतर फेब्रुवारीमध्येच नोटीसही बजावली आहे.

प्रशासनाकडून या कामासाठी विशेष प्रयत्न केले जात असताना मिळकती भाडेकराराने देण्याचे प्रस्ताव महिनोमहीने सर्वसाधारण सभेच्या कार्यपत्रिकेवर पडून राहीले आहेत.
नुकतेच मागील महिन्यांतील सर्वसाधारण सभेमध्ये यापैकी काही प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असली तरी ‘मोक्याच्या’ जागांवरील प्रस्ताव कायमच रेंगाळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
त्यामुळे स्थायी समितीने आजजरी सर्व मिळकतींची असेसमेंट करण्याचा निर्णय घेतला असला तरी
भुमिप्रापण विभागाने हे काम यापुर्वीच सुरू करून पालिकेच्या तिजोरीत मोलाची
भर घालत प्रशासन एक पाऊल पुढे असल्याची चुणूक दाखवून दिली आहे.

Web Title : Pune Corporation | Standing Committee’s ‘Horses Behind the Show’!
The decision of the Standing Committee on ‘Proceedings’ of the administration for a year now

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Anti Corruption Pimpri Chinchwad | 9 लाखाचे लाचेचे प्रकरण !
पिंपरी-चिंचवड मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे यांच्यासह चौघे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

NDA Exam for Women | आता महिला सुद्धा देऊ शकतात एनडीएची परीक्षा,
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Pune Crime | पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने सपासप वार, 3 जणांवर FIR