Pune Corporation | चोवीस तास पाणी पुरवठा योजनेच्या कामात ‘टर्मिनेट’ केलेल्या कंपनीची ‘जायका’ नदीसुधारसाठी निविदा; ‘जॉंईट व्हेंचर’मध्ये मदत केल्याने अडचणीत !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | चोवीस तास पाणी पुरवठा योजनेमध्ये समाधानकारक काम न केल्याने टर्मिनेट केलेल्या एका जॉईंट व्हेंचर कंपनीमधील एका कंपनीनेच जायकाच्या (jica) माध्यमातून होणार्‍या नदी सुधार योजनेसाठी निविदा भरल्याची बाब समोर आली आहे. विशेष असे की, या जॉईंट व्हेंचरमधील उर्वरीत दुसरी कंपनी महापालिकेच्या (Pune Corporation) ‘टर्मिनेशन’च्या कारवाई विरोधात आर्बिट्रेशनमध्ये गेली असून आर्बिट्रेटरने महापालिकेच्या विरोधात निकाल देत या कंपनीला ३० कोटी रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. परंतू महापालिकेने अद्यापही याबाबत उच्च न्यायालयात (High Court) दाद मागितली नसल्याने महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

महापालिकेच्यावतीने (Pune Corporation) जुन्या हद्दीमध्ये चोवीस तास पाणी पुरवठा योजनेची कामे सुरू आहेत. याअंतर्गत मार्च २०१८ मध्ये पाईपलाईन तसेच मिटर बसविण्याच्या कामाच्या वर्क ऑर्डर देण्यात आल्या आहेत. सहा पॅकेजमध्ये काढण्यात आलेल्या या निविदांमधील पाच निविदा या एल ऍन्ड टी (L & T) या कंपनीला मिळाल्या असून चार नंबरच्या पॅकेजमधील निविदा जैन इरिगेशन या कंपनीला मिळाली होती. विशेष असे की या निविदांपुर्वी काढण्यात आलेल्या निविदा वादग्रस्त ठरल्या त्यावेळी जैन इरिगेशनची निविदा अपात्र ठरली होती. मात्र, फेरनिविदांच्यावेळी त्यांनी एस. पी. एम. एल. या कंपनीसोबत जॉईंट व्हेंचर करत निविदा भरली व त्यांना ३२५ कि. मी. पाईपलाईन टाकण्याचे ३७६ कोटी रुपयांच्या निविदेचे काम मिळाले. या कामाची मुदत पाच वर्षे होती.

या कंपनीने कराराप्रमाणे अपेक्षित गती न राखल्याने मागीलवर्षी जुलैमध्ये या कंपनीला टर्मिनेट करण्यात आले. टर्मिनेट करण्यापुर्वीपर्यंत या कंपनीने एकूण कामापैकी जेमतेम २२ टक्केच काम केले आहे. या कंपनीने केलेल्या कामांची ९ कोटी रुपयांची रनिंग बिले देखिल महापालिकेने काढली आहेत. परंतू ही बिले न घेताच कंपनी महापालिकेविरोधात आर्बिट्रेशनमध्ये गेली. कंपनीने आर्बिट्रेशनमध्ये कोरोनामुळे थांबलेले काम व अन्य अडचणींमुळे झालेले नुकसान व त्यावरील व्याज अशी ३० कोटी रुपयांची महापालिकेकडे केली आहे. आर्बिट्रेटरनेही कंपनीची बाजू ग्राह्य धरत महापालिकेने ३० कोटी रुपये द्यावेत, असे आदेश दिल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

दरम्यान, महापालिकेने जायका कंपनीच्या सहकार्याने नदीसुधार योजनेसाठी सुमारे चौदाशे कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा मागविल्या आहेत.
यासाठी सहा निविदा आल्या आहेत.
त्यापैकी एक निविदा चोवीस तास पाणी पुरवठा योजनेतील जैन इरिगेशनची भागीदार कंपनी असलेल्या एस. पी. एम. एल. कंपनीची आहे.
या कंपनीने जे. डब्ल्यू. आय. एल. व एस. एस.जी. या कंपनीसोबत जॉईंट व्हेंचरमध्ये जायकाच्या कामासाठी निविदा भरली आहे.
मात्र जॉईंट व्हेंचरमध्ये केलेल्या चोवीस तास पाणी पुरवठ्याच्या कामांत महापालिकेनेच टर्मिनेट केल्याने या कंपनीची मात्र अडचण झाल्याचे समजतेय.
यासंदर्भात संबधित विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, होउ तो होउ शकला नाही.

Web Titel :- Pune Corporation | Tender for ‘Jaika’ river improvement of a company ‘terminated’ in the work of a twenty-four hour water supply scheme; Troubled by helping out at ‘Joint Venture’!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात मांत्रिकाच्या मदतीने आघोरी पुजा करुन पतीला ब्लॅकमेक करुन 1 कोटीची मागणी; पत्नीसह 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Cyber Crime | धनंजय मुंडे, करुणा शर्मांचे फोटो टाकून FB वर बदनामीकारक ‘पोस्ट’ ! शरद पवार, फडणवीस, संजय राऊत यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांबद्दल अश्लिल ‘मजकूर’; पुण्यात गुन्हा दाखल

Ahmednagar Crime | उच्चदाब विजेच्या टॉवरखाली अडकून तरुणाचा मृत्यू, तपासात धक्कादायक माहिती उघड