Pune Corporation | सत्ताधारी अखेर नमले ! शहरातील कचरा गोळा करण्याचे काम ‘स्वच्छ’ संस्थेकडेच राहणार

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  शहरात वर्षानुवर्षे स्वच्छतेचे काम करणार्‍या ‘स्वच्छ’ संस्थेलाच यापुढील काळातही काम देण्यात येणार असल्याची ग्वाही महापालिकेतील (Pune Corporation) सत्ताधारी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या (BJP) पदाधिकार्‍यांनी सोमवारी दिली. ‘स्वच्छ’च्या कामाबद्दल ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव (dr baba adhav) आणि पालिकेतील (Pune Corporation) पदाधिकारी यांच्यामध्ये सोमवारी बैठक झाली. यामध्ये ही ग्वाही देण्यात आली.

शहरात सुरू असलेले स्वच्छ संस्थेचे (swachh sanstha pune) काम काढून घेण्याचा कोणताही विचार पालिकेचा नाही.
उलट हे काम अधिक चांगल्या पद्धतीने होऊन नागरिकांच्या तक्रारी कमी करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने आवश्यक ती पावले उचलली जात असल्याचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सांगितले.
स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, डॉ. बाबा आढाव यांच्यासह स्वच्छ संस्थेचे सेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

शहर स्वच्छ ठेवण्याचे काम मोठे कठीण असून स्वच्छ शिवाय हे काम होणार नाही.
आम्ही यापूर्वी तसेच पुढील काळातही स्वच्छ बरोबर असून त्यांच्याबरोबरचा करार वाढवून त्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात येईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
पालिका (Pune Corporation) प्रशासनाने तातडीने स्वच्छ संस्थेच्या कराराचा प्रस्ताव ठेवावा,
अशा सूचना या बैठकीत प्रशासनाला देण्यात आल्या.

 

स्वच्छचे काम काढून घेतले जाणार नाही : महापौर मोहोळ (mayor murlidhar mohol)

स्वच्छ संस्थेच्या (swachh sanstha pune) माध्यमातून सुरु असलेले काम काढून घेतले जाणार नाही. स्वच्छच्या कामाला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना आयुक्तांना दिली असून लवकरच योग्य तो निर्णय होईल.

स्वच्छ संस्थेच्या सुमारे पाच हजार कष्टकरी महिला शहरात घरोघरी जावून ओला व सुका कचरा
गोळा करतात. त्यांच्या कामामुळेच शहर कंटेनरमुक्त होउ शकले असून ओला व सुका
कचरा स्वतंत्र गोळा केला जात असल्याने त्यावर प्रक्रिया करणेही बर्‍याचअंशी सुलभ झाले आहे.
दरम्यान, या संस्थेचा महापालिकेसोबतचा करार काही महिन्यांपुर्वी संपल्यानंतरही कोरोना काळात संस्थेच्या कर्मचार्‍यांनी सेवेत कुठलाही खंड पडू न देता शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. मात्र, प्रशासन आणि महापालिकेतील सत्तेतील काही पदाधिकार्‍यांकडून खाजगी कंपनीला कचरा विलगीकरणाचे काम मिळावे यासाठी प्रयत्न सुरू होते.
यामुळेच स्वच्छ सोबत करार न करता केवळ महिन्या दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात येत होती.
स्वच्छ संस्थेच्या कर्मचार्‍यांनी काम सुरू ठेवतच वेळोवेळी आंदोलनही केले.
येत्या काही दिवसांत ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली व्यापक आंदोलन
करण्याचा इशारा दिल्यानंतर आज सत्ताधार्‍यांनी बैठक घेउन कचरा गोळा करण्याचे
काम स्वच्छ संस्थेकडेच राहील असे आश्‍वासन दिले.

 

Web Title : Pune Corporation | The ruling BJP finally bowed down ! Garbage collection in the city will be done by a swachh sanstha pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | व्यावसायिकास जीवे मारण्याची धमक्या देत उकळली दरमहा 10 लाखांची खंडणी; ‘इंडस’च्या सहा अधिकार्‍यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Pegasus Case | एनएसओ समूहासोबत कुठलाही व्यवहार झाला नाही; केंद्र सरकारने केलं स्पष्ट

PM-Kisan | मोठी खुशखबर ! 9.5 शेतकर्‍यांच्या खात्यात आला 9वा हप्ता, चेक करा तुमच्या अकाऊंटमध्ये आलेले पैसा?