Pune Court News | पुणे : आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Court News | शतावरी वनस्पतीची रोपे विकून त्यातून लाखो रुपयांचा नफा मिळवून देण्याचे आश्वासन देऊन शेतकऱ्याची फसवणूक (Cheating Fraud Case) केली. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यतील आरोपी माधव निवृत्ती गायकवाड (Madhav Nivritti Gaikwad) याला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. वाघमारे (Judge A.S. Waghmare) यांनी अटकपूर्व जामीन (Anticipatory Bail) मंजुर केला आहे.(Pune Court News)

आरोपी माधव गायकवाड याने एका शेतकऱ्याला शतावरी वनस्पतीच्या रोपांची विक्री केली. पीक मोठे झाल्यानंतर ते आम्ही खरदे करु. यातून तुम्हाला लाखो रुपयांचा नफा मिळेल, असे आश्वासन देऊन आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणामध्ये आरोपीने ॲड. विजय विठ्ठलराव पवार (Adv. Vijay Vitthalrao Pawar) व ॲड.देवांशी अतुल बुरांडे (Adv. Devanshi Atul Burande) यांच्या मार्फत अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात अर्ज केला होता. वकिलांचा प्रभावी युक्तिवाद मान्य करत जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाघमारे यांनी आरोपीला 30 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणांमध्ये आरोपीतर्फे ॲड.विजय पवार व ॲड. देवांशी बुरांडे यांनी काम पाहिले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Nilesh Lanke | नगरमध्ये राजकीय हालचालींना वेग, निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, बोलावली तातडीची सभा

Pune Court News | पुणे : पार्किंगच्या वादातून खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला जामीन मंजूर

Mumbai To Pune Cabs | मुंबई ते नाशिक, शिर्डी, पुणे प्रवास महागणार, जाणून घ्या नवे दर

Vasant More-Prakash Ambedkar | वसंत मोरे उमेदवारीसाठी आता प्रकाश आंबेडकरांना भेटणार? जरांगे-आंबेडकर-शेंडगे समीकरणातून ठरू शकतात ‘गेम चेंजर’

Bachchu Kadu Targets Navneet Rana | बच्चू कडू वर्ध्यातून निवडणूक लढवणार? ३०० कार्यकर्त्यांनी रक्तदानाद्वारे केली मागणी, नवनीत राणांबद्दल म्हणाले…

Pune Kothrud Crime | पुणे : कॉलसेंटरमध्ये काम करणाऱ्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी, आयटी इंजिनिअरवर गुन्हा दाखल