Pune Court | रविंद्र बर्‍हाटेचा मुक्काम औरंगाबाद येथील कारागृहातच; जाणून घ्या प्रकरण

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –   Pune Court | खंडणी, धमकाविणे, बेकायदा सावकारी आणि आर्थिक फसवणूक अशा गुन्ह्यांतील टोळीप्रमुख माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र ब-हाटे (ravindra barate) याचा मुक्काम औरंगाबाद येथील कारागृहात राहणार आहे. त्याने औरंगाबाद कारागृहातून येरवडा कारागृहामध्ये हलविण्यासाठी केलेले अर्ज न्यायालयाने (Pune Court) फेटाळला आहे. विशेष मोक्का न्यायाधीश एस. आर. नावंदर (Special Mocca Judge S. R. Navander) यांनी हा आदेश दिला.

ब-हाटे (ravi barate) याचे येथील काही स्थानिक राजकीय नेते. तसेच प्रशानसनातील काहींची चांगले नाते आहे. त्या व्यक्तींच्या माध्यमातून तो तपासात अडथळे निर्माण करू शकतो. तसेच येरवडा कारागृहातून त्यांचे उद्योग सुरूच राहू शकता. त्यामुळे त्याला औरंगाबाद कारागृहातील कोठडीत ठेवण्यात आले आहे. मात्र त्याने आरोग्याचे कारण देत येरवडा कारागृहात हलविण्याचा अर्ज न्यायालयात केला होता. ससून रुग्णालयामध्ये हृदयविकारा संदर्भात उपचार करायचा आहे. त्यामुळे मला येरवडा कारागृहात पाठविण्यात यावे, अशी मागणी ब-हाटे याने अर्जाद्वारे केली होती. या अर्जाला विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Special Public Prosecutor Praveen Chavan) यांनी विरोध केला. ब-हाटे याची जानेवारी महिन्यात अ‍ॅन्जिओप्लास्टी झालेली आहे.

औरंगाबादला हलविण्यापुर्वी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, डॉक्टरांनी प्रवास करण्यासाठी त्याला कोणती अडचणी नसल्याचे सांगितले आहे.
औरंगाबाद येथील घाटी शासकीय रुग्णालयात अद्ययावत सुविधा आहेत. त्यामुळे गरज पडल्यास तेथे त्याच्यावर सर्व प्रकारचे उपचार केले जाऊ शकतात.
आवश्‍यक असेल तर त्याला मुंबई येथील शासकीय रग्णालयात (Mumbai Government Hospital) देखील पाठवता येईल. त्यामुळे त्याचा अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद अँड. चव्हाण यांनी केला. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने ब-हाटे याचा अर्ज फेटाळण्यात आला.

 

षडयंत्र करण्याची शक्यता :

उपचारसाठी त्याला येरवडा कारागृहात आणण्याची करण्याची गरज नाही.
त्याला येथे ठेवल्यास तो काही षडयंत्र करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
असे ॲड. चव्हाण यांनी न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले.

 

Web Title : Pune Court | Ravindra Barhat’s stay in Aurangabad Jail; Learn the case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | पुण्यातील आर्मी स्टेडियमला ‘ऑलिम्पिक गोल्ड मेडल’ जिंकणार्‍या नीरज चोप्राचं नाव

Pune Crime Branch Police | घरफोडी करणाऱ्या सख्ख्या भावांच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या, 9 लाखांचा ऐवज जप्त

Remove Darkness | शॉर्ट आणि स्लीव्हलेस ड्रेस परिधान करण्यास लाज वाटते; ‘या’ टिप्स वापरुन बघा