Pune Crime | बनावट कुलमुखत्यार तयारकरुन 18 लाखांची फसवणूक, दोन महिलांसह 3 जणांविरुद्ध FIR; विमाननगर परिसरातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कुलमुखत्यार पत्राद्वारे बनावट बक्षिसपत्र तयार करुन एकाची 18 लाखांची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी 3 जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2018 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत विमानतळ परिसरात (Pune Crime) घडला आहे.

बाळासाहेब गंगाराम ढमाले Balasaheb Gangaram Dhamale (वय-57 रा. आंबेगाव, जि. पुणे), सुषमा आत्माराम मोकाशी Sushma Atmaram Mokashi (वय-42 रा. ओम सदन, बाणेर, पुणे), सिमा भिमराव म्हस्के Sima Bhimrao Mhaske (वय-42 रा. 5 गार्डन, रो हाऊस नंबर 215, रहाटणी) यांच्याविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात (Vimantal Police Station) आयपीसी 467, 468, 471, 420, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिनेश आण्णासाहेब जगताप Dinesh Annasaheb Jagtap (वय-29 रा. यशोदा नंदन सोसायटी, विमाननगर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी बाळासाहेब ढमाले यांच्याकडून लोहगाव (Lohgaon)
येथील कोनार्क नगर को. ऑप. हाऊसिंग सोसायटी येथील दुकान गाळा विक्री करण्याचा ठराव केला.
त्यानुसार बाळासाहेब ढमाले यांनी फिर्यादी यांच्याकडून 18 लाख रुपये घेतले.
यानंतर सध्या मृत आत्माराम दादासाहेब मोकाशी, सुषमा मोकाशी, सिमा मस्के यांनी संगनमत करुन
कुलमुखत्यार तयार करुन बक्षिसपत्र तयार केले. यावर बाळासाहेब ढमाले यांच्या बनावट सह्या केल्या.
आरोपींनी हा दस्त दुय्यम निबंधक कार्यालयात (Sub-Registrar Office) नोंदवून फिर्यादी व शासनाची
फसवणुक केली. याबाबत दिनेश जगताप यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता.
या अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लहाणे (API Lahane) करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | 18 lakhs fraud by creating fake power of attorney, FIR against 3 persons including two women; Type in airport area