Pune Crime | गुन्हे शाखेकडून 2 लाखांचे एम. डी ड्रग्ज जप्त, पुण्यातील लष्कर परिसरात कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मेफेड्रोन Mephedrone (एम.डी) हा अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक दोनने (Anti Narcotics Cell Pune) अटक केली आहे. आरोपीकडून 2 लाख 12 हजार रुपये किमतीचे 53 ग्रॅम मेफेड्रोन (एम.डी) जप्त करण्यात आले आहे. अझीम मोहंमद युसूफ मोहंमद Azim Mohammad Yusuf Mohammad (वय – 34 रा. नवपाडा, कुर्ला, पश्चिम मुंबई) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी (Pune Police) आरोपीविरुद्ध लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) एन. डी. पी. एस. अ‍ॅक्ट (N.D.P.S. Act) कायद्यानुसार गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना अंमली विरोधी पथक दोनच्या पोलिसांना माहिती मिळाली की, लष्कर पुणे येथे एक व्यक्ती अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने लष्कर परिसरातील सैफी स्ट्रीट येथील सार्वजनिक रोडवर सापळा रचला. त्यावेळी अझीम मोहंमद हा संशयित रित्या आढळून आला. पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 2 लाख 12 हजार रुपये किमतीचे 53 ग्रॅम एमडी हा अंमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड (API Gaikwad) करीत आहेत. (Pune Crime)

ही कारवाई आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
पोलीस उपायुक्त (आर्थिक व सायबर) भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navatke)
अतिरिक्त कार्यभार अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे – 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर (Police Inspector Prakash Khandekar), पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण (PSI Digambar Chavan), पोलीस प्रसाद बोमदांडी, मयूर सूर्यवंशी, संतोष देशपांडे, रोकडे, चेतन गायकवाड, जाचक, साहिल शेख, शेळके, खेलवकर, आझीम शेख, योगेश मांढरे, नितीन जगदाळे, दिनेश बास्टेवाड यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Crime | 2 lakh MD drugs seized from Pune Police Crime Branch, action taken in Camp area in Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा