Pune Crime | 24 वर्षीय तरूणीची 4 मजली इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या, पुण्याच्या वाकड परिसरातील घटना

पुणे / पिंपरी: पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शिक्षणासाठी वडिलांनी थांबवल्याच्या रागातून 24 वर्षीय उच्चशिक्षित युवतीने 4 मजली इमारतीवरून उडी मारत (Pune Crime) आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शहरातील वाकड परिसरात घडली. नम्रता गोकुळ वसईकर Namrata Gokul Vasaikar (वय 24, रा. नंदनवन कॅालनी, माऊली चौक, वाकड – Wakad News) असं आत्महत्या केलेल्या मृत (Died) युवतीचे नाव आहे. या घटनेने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

 

याबाबत माहिती अशी, मृत नम्रता वसईकर ही सकाळी 5.45 च्या दरम्यान बाहेर पडली. माऊली चौकातील एका 4 मजली इमारतीच्या छतावर गेली. तिने आपलया चेहऱ्याला स्कार्फ बांधत छतावरून उडी मारली. यात नम्रता गंभीर जखमी झाली. तिच्या डोक्याला आणि पायाला गंभीर मार लागला. याबाबत एका अनोळखी व्यक्तीने पोलीसात माहिती दिल्याने पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर तिला वायासीएम रुग्णालयात दाखल केले, पंरतु, तत्पुर्वी तिचा मृत्यू (Died) झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. (Pune Crime)

 

 

दरम्यान, नम्रता घरी नसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
त्यावेळी तिथे नम्रताचा फोटो दाखवला, तेव्हा पोलिसांकडून संबधित घटनेचा उलगडा झाला.
पोलिसांनी कुटुंबियांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यावेळी याप्रकरणी कुटुंबियांना मोठा धक्का बसला.
दरम्यान, मृत नम्रता हिचे ‘बीटेक’ (IT) पर्यंतचे शिक्षण झालेय. तिचे वडील चर्मकार असून चपला व बूट पॉलिश करतात.
बीटेक नंतर नम्रताला साॅफ्टवेअरमधील काही ‘भाषा’ ही शिकायच्या होत्या, यासाठी खर्च होता.
एवढा खर्च कुटुंबियांना शक्य नव्हता. पण, बीटेकच्या शिक्षणावर तिला नोकरी मिळली असती मात्र पुढे शिकता येत नसल्याच्या नैराश्यातून तिने आत्महत्या (Suicide) केल्याचा प्राथमिक अंदाज वाकड पोलिसांनी (Wakad Police Station) वर्तवला आहे.

 

Web Title :- Pune Crime | 24 year old girl Namrata Gokul Vasaikar committed suicide by jumping from a building in wakad area of pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा