Pune Crime | प्रेमात झाला धोका, ट्रेनवर चढून ओव्हरहेड वायर धरली; पुणे स्टेशनमधील धक्कादायक प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | प्रेमभंगातून (Love Break) एका तरुणाने पुणे रेल्वे स्थानकात (Pune Railway Station) आत्महत्येचा प्रयत्न (Suicide Attempt) केला. तरुणाने रेल्वे स्टेशन येथील प्लॅटफार्म क्रमांक एकवर उभ्या असलेल्या गोरखपुर एक्सप्रेस वर (Gorakhpur Express) चढून रेल्वेची ओव्हरहेड वायर (Overhead Wire) पकडली. यामध्ये स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना (Pune Crime) आज (शनिवार) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडली. वीजेचा जोरदार धक्का लागल्यानंतर तरुण उडून प्लॅटफॉर्मवर पडला. त्याला पोलिसांनी तात्काळ उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये (Sassoon Hospital) दाखल केले आहे.

गोवर्धन मल्ला Govardhan Malla (वय-33 रा. कटक, ओरिसा) असं या तरुणाचं नाव आहे. मल्ला हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. तो कामानिमित्त पुण्यात आला होता. तो खेड परिसरातील एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. त्याच्याकडे विशाखापट्टणम गाडीचे (Visakhapatnam) तिकीट सापडले आहे, अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी (Railway Police) दिली. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडिया कॉलेज (Wadia College) जवळील सिग्नल येथे गोरखपुर एक्सप्रेस थांबली होती. त्यावेळी मल्ला हा गाडीवर चढला. तो रेल्वे गाडीवरुन चालत आला. गोरखपुर एक्सप्रेस ही पुणे स्टेशन प्लॅटफार्म क्रमांक एक येथे आल्यानंतर तो रेल्वेवर चालत होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याने तारेला हात लावताच मोठा स्फोट झाला. तो उडून प्लॅटफार्म वर पडला.

लोहमार्ग पोलिसांनी त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले.
त्याच्यावर उपचार सुरु असून तो पूर्णपणे भाजला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
या घटनेची माहिती त्याच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे.
त्याने प्रेम भंगातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title :-Pune Crime | 33 year youngster attempt to suicide on railway station marathi crime news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe | राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे गृहमंत्री अमित शहांना भेटले, राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण

India Legends Vs Sri Lanka Legends | भारत पुन्हा एकदा चॅम्पियन होणार? इंडिया लीजेंड्स समोर श्रीलंका लीजेंड्सचे तगडे आव्हान