India Legends Vs Sri Lanka Legends | भारत पुन्हा एकदा चॅम्पियन होणार? इंडिया लीजेंड्स समोर श्रीलंका लीजेंड्सचे तगडे आव्हान

पोलीसनामा ऑनलाईन – India Legends Vs Sri Lanka Legends | ज्या खेळाडूंनी क्रिकेटमधून निवृत्ती (Retirement) घेतली अशा माजी खेळाडूंसाठी लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धा (Legends League Cricket Tournament) खेळवली जाते. या स्पर्धेत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नेतृत्त्वाखाली इंडिया लीजेंड्स, श्रीलंका लीजेंड्सविरुद्ध अंतिम सामना (India Legends Vs Sri Lanka Legends) पार पडणार आहे. यंदाच्या हंगामात इंडिया लीजेंड्सने आतापर्यंत 6 सामने खेळले. यामधील तीन सामने पावसामुळे अनिर्णित राहिले, असून इतर तीन सामन्यांमध्ये इंडिया लीजेंड्सने एकतर्फी विजय मिळवला आहे. या सामन्यात सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), युवराज सिंह (Yuvraj Singh), सुरेश रैना (Suresh Raina) आणि युसूफ पठाण (Yusuf Pathan) दमदार कामगिरी करत आहेत.

कधी, कुठे पाहणार सामना?

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचा (Road Safety World Series) आजचा हा अंतिम सामना रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये (Shaheed Vir Narayan Singh International Cricket Stadium) खेळवण्यात येणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार 7.30 वाजता खेळवला जाणार आहे. या सामन्याचे लाईव्ह टेलीकास्ट सिनेप्लेक्स आणि स्पोर्ट्स-18 चॅनलवर पाहता येणार आहे. तसेच लाईव्ह स्ट्रिमिंग Voot वर देखील हा सामना पाहता येणार आहे.

कसे आहेत दोन्ही संघ?

इंडिया लीजेंड्स

सचिन तेंडुलकर (कर्णधार), सुरेश रैना, युवराज सिंह, इरफान पठाण, युसूफ पठाण, हरभजन सिंह, मुनफ पटेल,
सुब्रमण्यम बद्रीनाथ, स्टुअर्ट बिन्नी, नमन ओझा, मनप्रीत गोनी, प्रज्ञान ओझा, विनय कुमार, अभिमन्यू मिथुन,
राजेश पंवार आणि राहुल शर्मा.

श्रीलंका लीजेंड्स

सनथ जयसूर्या, चमिंडा वास, तिलकरत्ने दिलशान (कर्णधार), चमारा सिल्वा, कौशल्या वीरारत्ने, उपुल थरंगा,
चिंतका जयसिंगे, दिलरुवान परेरा, जीवन मेंडिस, धम्मिका प्रसाद, नुवान कुलसेकरा, महेला उदावत्ते,
चमारा कपुगेदरा, दिलशान मुनवीरा, इसुरु उडाना, असाला गुणरत्ने

Web Title :- India Legends Vs Sri Lanka Legends | road safety world series final 2022 india legends will play against sri lanka legends sachin tendulkar will be in action

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe | राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे गृहमंत्री अमित शहांना भेटले, राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण

Pune Crime | शाळेतील मुलाचा लैंगिक छळ करणाऱ्या माजी मुख्याध्यापकासह दोन धर्मगुरुंवर FIR

Maharashtra Politics | पेंग्विनने खुप प्रसिद्धी दिली…तुम्ही पेंग्विन सेना बोलत रहा, आदित्य ठाकरेंचा शिंदे गट आणि भाजपाला टोला