Pune Crime | 36 वर्षीय महिलेवर बलात्कार ! ज्येष्ठ वकिलावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; डेक्कन, गोकुळनगर-कोंढवा आणि शनिवार पेठेतील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | फ्लॅट नावावर करुन देतो, असे सांगून महिलेला फ्लॅटवर घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार (Rape In Pune) करणार्‍या एका ज्येष्ठ वकिलावर (Senior Lawyer) पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

वसंत धडकु पाटील Vasant Dhadku Patil (वय ७५, रा. गोदरेज रोझवूड सोसायटी, शिवाजीनगर – Godrej Rosewood Society, Shivajinagar, Pune) असे गुन्हा दाखल झालेल्या वकिलाचे नाव आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी कोंढव्यात (Kondhwa) राहणार्‍या एका ३६ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ८२९/२२) दिली आहे.
हा प्रकार डेक्कन, गोकुळनगर – कोंढवा आणि शनिवार पेठेत मार्च २०१९ ते १८ मे २०२२ दरम्यान घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा व्यवसायाने वकिल असून फिर्यादी यांना बदनामी करण्याची धमकी (Threat Of Defamation) देऊन त्यांच्याविषयी पतीला उलट सुलट सांगण्याची भिती दाखविली.
फिर्यादीच्या लहान मुलाचे बरेवाईट करण्याची भिती दाखविली.
फिर्यादीने त्याच्याकडून हेवी डिपॉझिटवर घेतलेला फ्लॅट फिर्यादीच्या नावावर करुन देण्याचे आमिष (Lure Of Property) दाखविले.
त्यांना शनिवार पेठेतील फ्लॅटवर (Flats In Shaniwar Peth Pune)
घेऊन जाऊन त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले.
त्यांच्या या त्रासाला कंटाळून शेवटी फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली असून सहायक पोलीस निरीक्षक शिळमकर तपास करीत आहेत.

 

 

Web Title : –  Pune Crime | 36 year old woman raped  A case was registered against the senior lawyer in Kondhwa Police Station Incidents in Deccan Gokulnagar Kondhwa and Shaniwar Peth Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा