Pune Crime | 79 वर्षाच्या ‘शौकीन’ वृध्दास ‘डेटींग’ची हौस पडली 17 लाखांना, जाणून घ्या वारजे माळवाडीमधील प्रकरण

पुणे : Pune Crime | डेटिंगसाठी (Dating) मुलगी हवी आहे का असे विचारुन एका ७९ वर्षाच्या नागरिकाला फोटो पाठवून त्याच्याकडून तब्बल १७ लाख १० हजार रुपयांना एका महिलेने गंडा (Fraud Case) घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याबाबत पॉप्युलरनगर येथे राहणार्‍या एका ७९ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने वारजे पोलिसांकडे (Waraje Police) फिर्याद (गु. रजि. नं. ४३६/२२) दिली आहे. त्यावरुन श्रेया असे नाव सांगणार्‍या महिलेवर पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डिसेबर २०२१ पासून २९ जून २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पॉप्युलरनगर येथे राहतात. ते घरी असताना त्यांना एका
महिलेचा फोन आला. त्यात तिने तुम्हाला डेटिंगसाठी मुलगी हवी आहे का अशी विचारणा केली.
तेव्हा फिर्यादी यांनी तिला फोटो पाठविण्यास सांगितले. त्यावर फोटो पाठविण्यासाठी तिने फिर्यादी यांना वेळोवेळी
पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना धमकावून पोलीस तक्रार देण्याची भिती दाखवून त्यांच्याकडून
एकूण १७ लाख १० हजार रुपये पाठविण्यास लावून फसवणूक (Cheating Case) केली.
शेवटी त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक बागवे (Police Inspector Bagway) तपास करीत
आहेत.

Web Title :-  Pune Crime | 79-year-old ‘hobby’ old man got 17 lakhs of passion for ‘dating’, know the case of Warje Malwadi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update