Pune Crime | फिल्म इंडस्ट्रीमध्ये ‘काम’ देण्याच्या आमिषाने पुण्यातील 31 वर्षीय विवाहीतेवर वेळोवेळी ‘लैंगिक’ अत्याचार, महिलेसह पतीला जीवे मारण्याची धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | फिल्म इंडस्ट्रीजमध्ये शॉर्ट फिल्ममध्ये (short films) काम देतो, असे सांगून अनेक तरूणींची लैंगिक शिकार केल्याचे प्रकरण २ वर्षापूर्वी बॉलीवूडमध्ये (bollywood casting couch incidents) चांगलेच गाजले होते. पुण्यात असा धक्कादायक प्रकार सुरु असल्याचे समोर (Pune Crime) आले आहे. शॉर्ट फिल्ममध्ये काम देण्याच्या आमिषाने नराधमाने 31 वर्षीय विवाहीतेवर वेळावेळी बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 

एका ३१ वर्षाच्या महिलेच्या फिर्यादीवरुन कोंढवा पोलिसांनी Kondhwa Police Station)
समीर बाळू निकम Sameer Balu Nikam (वय ३२, रा. जिजाऊ बिल्डींग, नर्‍हेगाव) याला अटक केली आहे.
हा प्रकार ऑक्टोबर २०१७ पासून १६ ऑक्टोबर २०२१ पर्यंत फिर्यादीच्या घरी आणि कोंढवा परिसरात सुरु होता.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर निकम (Sameer Nikam) हा यु ट्युबवर (YouTube) शॉर्ट फिल्म बनवितो. काही गाणीही त्याने बनविली आहेत.
या शॉर्ट फिल्ममध्ये काम देण्याच्या बहाण्याने त्याने फिर्यादी (Pune Crime) यांच्याशी ओळख वाढविली.
त्यांच्या डोळ्यासमोर फिल्म इंडस्ट्रीचे स्वप्न उभे करुन त्यात काम मिळवून देण्याचा बहाणा करुन त्यांच्याशी शारीरीक जवळीक साधली.
त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी (Pune Crime) देऊन त्यांना मारहाण करुन वारंवार जबरदस्तीने बलात्कार केला.
पोलीस उपनिरीक्षक सचिन खेतमाळस (PSI Sachin Khetmalas) अधिक तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Post Office PPF | वर्षाला फक्त आणि फक्त 500 रुपयांनी सुरू करा आपलं अकाउंट, म्हातारपणात मिळवा पेन्शनचा ‘लाभ’, जाणून घ्या ‘या’ सरकारी स्कीमबाबत

Pune Crime | दुर्दैवी ! भाजीपाला विक्री करुन घरी परतणाऱ्या मायलेकरावर काळाचा घाला, कंटेनरखाली दबून दोघांचा मृत्यू

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  A 31-year-old married woman from Pune has been raped from time to time for offering work in the film industry or bollywood

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update