Pune Crime | ज्युनिअर महिला वकिलाचा विनयभंग करणार्‍या वकिलावर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आपल्याकडे काम करणार्‍या ज्युनिअर महिला वकिलाकडे (Junior Women Advocate) किस (Kiss) मागून शिवाजीनगर येथील न्यायालयाच्या (Shivajinagar Court) आवारात तिच्याबरोबर लज्जास्पद वर्तन करण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी एका महिला वकिलाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ११३/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अ‍ॅड. धर्मराज विनायक जाधव Adv. Dharmaraj Vinayak Jadhav (वय ४०, रा. वाघोली) याच्यावर विनयभंगाचा (Molestation) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार पुणे नगर रोडवरील (Pune Nagar Road) शिक्रापूरजवळ तसेच शिवाजीनगर येथील सिव्हिल बिल्डिंगच्या (Civil Building) जिन्याखाली व कोर्ट गेट नं १ जवळ ६ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता तसेच २६ जुलै रोजी दुपारी सव्वा वाजता घडला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या अ‍ॅड. जाधव याच्याकडे ज्युनिअर वकील म्हणून काम करीत आहेत.त्या आरोपीबरोबर मोटारीतून पुण्याकडे येत असताना आरोपीने “मोसम मस्ताना है,” असे म्हणून फिर्यादीकडे किस मागितला. तसेच शिवाजीनगर कोर्ट येथे असताना फिर्यादीला नको तेथे स्पर्श करुन मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच फिर्यादीचे पतीस व फिर्यादीला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक जाधव (Sub-Inspector of Police Jadhav) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | A case has been registered against a
lawyer who molested a junior female lawyer

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा