Pune Crime | कात्रज-मांगडेवाडी परिसरातील सावकारावर गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime | जागा खरेदी विक्री करणार्‍या व्यावसायिकाला १० लाखांच्या कर्जासाठी मर्सडिज बेन्झ गाडी गहाण ठेवून घेऊन व्याज वाढून आणखी ३३ लाखांची मागणी करणार्‍या दोघा सावकारांवर गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथकाने (Anti Extortion Cell Pune)
गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

उमेश श्रीहरी मांगडे (वय ३७, रा. श्रेया कॉम्प्लेक्स, मांगडेवाडी, कात्रज) आणि नवनाथ ज्ञानोबा मासाळ  (वय ४०, रा. माऊली निवास, पिसोळी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)

याबाबत उरुळी देवाची येथील एका ३४ वर्षाच्या व्यावसायिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५९९/२२) दिली आहे. हा प्रकार जानेवारी २०२० पासून सुरु होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा जागा खरेदीचा व्यवसाय आहे.
त्यांना व्यवसायासाठी १० लाख रुपयांची आवश्यकता होती. त्यांनी नवनाथ मासाळ यांच्याकडे पैसे मागितले.
त्यांनी त्यांच्या ओळखीचा सावकार उमेश मांगडे याच्याकडे घेऊन गेला.
त्याने फिर्यादीस १० लाख रुपये ५ टक्के प्रति महिना व्याज दराने दिले.
त्यासाठी त्यांची मर्सडिज बेन्झ गाडी गहाण ठेवून घेतली.
काही महिने व्याजाचे हप्ते घेऊन पुढील व्याजाचे पैसे अधिक वाढवून मागितले.
त्यापोटी फिर्यादीकडून १ फ्लॅट व १ शॉप चा समजुतीचा करारनामा करुन घेतला.
तो रद्द करण्यासाठी आणखी ३३ लाख रुपयांची मागणी करु लागला.
त्यामुळे त्यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | A case has been registered against a moneylender in Katraj-Mangdevadi area